मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. अशात भारताची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतचं आहे. कोरोना या धोकादायक विषाणूने अनेकांचा बळी देखील घेतला आहे. एकंदर परिस्थिती पाहाता कोरोना नियमांचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं झालं आहे. दरम्यान ९८ वर्षांचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी देखील ट्विट करत सध्याच्या परिस्थितीबद्दल काळजी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७६ वर्षांच्या सायरा बानो ९८ वर्षांच्या दिलीप कुमारांची काय काळजी घेतायत पाहा...
दिलीप कुमार ट्विट करत म्हणाले, 'सर्वांसाठी प्रार्थना करत आहे.' दिलीप कुमार सोशल मीडियावर  फार कमी ऍक्टिव्ह असतात. त्यांनी शेवटचं ट्विट 26 मार्च रोजी केलं होतं. गेल्या वर्षी कोरोना हे वादळ भारतात दाखल झालं, तेव्हा सायरा बानो यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दिलीप कुमर यांनी आयसोलेट केलं होतं. सायरा सध्या त्यांच्या पतीची फार काळजी घेतात.



दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या नात्याच्या चर्चा कायम रंगत असतात. सायरा बानो यांनी एका मुलाखतीत दिलीप हे माझे संपूर्ण आयुष्य आहे. असं सांगितलं. 'दिलीप कुमार यांचा स्पर्श आणि त्यांची काळजी घेणं माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे.' असं देखील सायरा म्हणाल्या.


शिवाय काही दिवसांपूर्वी त्या म्हणाल्या, 'माझ्यावर काही दबाव आहे, म्हणून मी दिलीप यांची काळजी घेते, असं नाही. तर मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करते, म्हणून मी त्यांची काळजी घेते. माझं कुणी कौतुक करावं म्हणून असं बिलकूल करत नाही.' असं देखील त्या म्हणाल्या.