पद्मावतच्यासमोर बाहुबली 2 ने देखील तोडला दम
25 जानेवारीला पद्मावत हा सिनेमा जगभर प्रदर्शित झाला.
मुंबई : 25 जानेवारीला पद्मावत हा सिनेमा जगभर प्रदर्शित झाला.
हा सिनेमा अगदी सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पद्मावत हा सिनेमा अनेक अजूनही अनेक राज्यात प्रदर्शित झालेला नाही. देशात जरी या सिनेमाला विरोध होत असला तरीही परदेशात या सिनेमाला पसंती मिळाली आहे.
इतका विरोध झाल्यानंतरही पद्मावत या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर भरपूर पसंती मिळाली आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली आहे. लाँग विकेंड या सिनेमाचा प्लस पॉईंट ठरला आहे. ऑस्ट्रेलियात या सिनेमाने 1.88 करोड रुपये कमाई केली तर न्यूझीलँडमध्ये 29.99 लाख रुपये आणि यूकेमध्ये प्रिव्यू स्क्रिनिंग 88.08 लाख रुपये कमाई केली आहे.
दीपिका पदुकोणने संजय लीला भन्साळीच्या या सिनेमावर पूर्ण विश्वास टाकला होता. 190 करोड रुपये खर्च करून भन्साळींनी हा सिनेमा तयार केला आहे. फक्त हिंदीतच नाही तर तेलगु आणि तामिलमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.