पाकिस्तान : भारतामध्ये आज अखेर अक्षयकुमारचा 'पॅडमॅन' रीलिज झाला आहे. सॅनिटरी पॅड आणि मासिकपाळी या विषयावर आधारित 'पॅडमॅन' या चित्रपटाने समाजात 'सॅनिटरी पॅड' आणि 'मासिकपाळी' विषयी दबक्या आवाजात बोलले जाते. मात्र रूपेरी पडद्यावर हा विषय आल्याने आत समाजात या विषयाबाबत खुल्याने बोलायला सुरूवात झाली आहे.  


पाकिस्तानात बॅन झाला चित्रपट  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पॅडमॅन'मुळे भारतामध्ये समाजात जागृती होण्यास सुरूवात झाली आहे. परंतू पाकिस्तानामध्ये मात्र 'पॅडमॅन' बॅन झाला आहे. पॅडमॅन चित्रपटाचा विषय पाहता पाकिस्तानामध्ये या चित्रपटाला मंजुरी मिळालेली नाही.  


काय आहे कारण 


'पॅडमॅन' चित्रपटाला पाकिस्तानामध्ये NOC मिळालेली नाही. IMGC च्या अमजद राशिदने या चित्रपटाला विकत घेतले होते. मात्र ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपट इम्पोर्ट न करण्याचा सल्ला  दिला आहे. 'मासिकपाळी' या विषयावरून पाकिस्तानामध्ये परिस्थिती बिघडू शकते.परिणामी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला आहे.


अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत  


अभिनेता अक्षयकुमार 'पॅडमॅन' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत झळकला आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटेदेखील खास भूमिकेत आहे.  


तामिळनाडूच्या अरुणाचलम मुरुगनाथम या 'पॅडमॅन'च्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. अरूणाचलम यांनी सॅनिटरी पॅड  बनवण्यासाठी खास मशीनची निर्मिती केली. त्यांचा संघर्ष रूपेरी पडद्यावर मांडण्यात आला आहे.  


 
 देशा-पदेशात रीलिज होणार चित्रपट 


 पॅडमॅन हा चित्रपट रशिया, आयवरी कोस्ट, इराक या देशामध्ये आज चित्रपट रीलिज होणार आहे. भारत आणि रशियामध्ये एकाच दिवशी रिलिज होणारा 'पॅडमॅन' हा पाहिला चित्रपट आहे.