नवी दिल्ली : सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत सिनेमामागील अडचणी काही केल्या संपत नाही आहेत. फक्त चित्रपटावर बंदी घालण्यात आलेली नाही तर निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साली आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हीला देखील धमक्यांचा सामना करावा लागला. हे प्रकरण इतक्यावरच थांबलेले नाही तर सेंसर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशींवर देखील करणी सेनेने निशाणा साधला आहे.


सेंसर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशींवर निशाणा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये करणी सेना सेंसर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशींना सहभागी होऊ देणार नाही. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल २५ जानेवारीला सुरू होत आहे. पद्मावत चित्रपटही त्याच दिवशी देशभरात प्रदर्शित होणार आहे. करणी सेना इतक्यावरच थांबलेली नसून आता लसंजय लीला भन्सालींना कोणत्याही चित्रपटाचे शूटींग राजस्थानमध्ये करू देणार नाही. 



सुप्रिम कोर्टाने दिला हिरवा कंदील 


काही राज्यात पद्मावतवर घातलेल्या बंदीविरूद्ध निर्मांत्यांनी केलेल्या याचिकेवर गुरूवारी सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. सुप्रिम कोर्टाने मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात वर घातलेल्या बंदी रद्द केली आहे. याचा अर्थ पद्मावत संपूर्ण देशभरात प्रदर्शित होण्यासाठी कोर्टाने हिरवा कंदील दिला आहे.


श्री श्री रविशंकर यांनी केले कौतुक


संजय लीला भन्साली यांनी ऑर्ट ऑफ लिव्हींगच्या बंगळूर सेंटरमध्ये चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. या स्क्रिनिंगमध्ये  श्री श्री रविशंकर यांनी देखील हा चित्रपट बघितला आणि चित्रपटाची चांगलीच स्तुती केली. डीएनएच्या वृत्तानुसार, श्री श्री रविशंकर यांनी चित्रपटाबरोबरच दीपिका, शाहीद आणि रणवीरच्या अभिनयाचेही कौतुक केले. ते म्हणाले की, चित्रपटाला का विरोध होत आहे, ते कळत नाही. खरंतर हा चित्रपट म्हणजे राजपूतांचा सन्मान आणि महाराणी पद्मिनीच्या सौंदर्याला एक सुंदर आदरांजली आहे.