नवी दिल्ली : संजय लीला भन्साळींचा पद्मावत हा चित्रपट आज प्रदर्शित होणार असला तरी देशातील काही मोठ्या प्रदेशात चित्रपट झळकणार नाही. इंदोर, भोपाळ, अहमदाबाद, बडोदा, जयपूर यांसारख्या मोठ्या शहरात हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. याचा नक्कीच परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होईल.


विरोध कायम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शनाला हिरवा कंदिल दिला असला तरी त्याला होणारा विरोध कायम आहे. त्यामुळे हिंसा, नुकसान टाळण्यासाठी वितरक आणि मल्टिप्लेक्सचे मालक चित्रपट लावण्याला नकार देत आहेत.
पहिल्या दिवशी चित्रपटाची कमाई २५ कोटी असेल, असे बोलले जात आहे. संध्याकाळपर्यंत शांततापूर्ण वातावरण राहिले तर कमाई ३० कोटींचा पल्ला पार करेल.


चित्रपटासाठी तब्बल इतका खर्च


पद्मावतची कथा १३ व्या शतकातील आहे. चित्रपट बनवण्यासाठी तब्बल १८० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. इतकंच नाही तर प्रिंट आणि प्रसिद्धीसाठी २५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण खर्च २०० कोटींपेक्षाही अधिक आहे. 


पद्मावत हिंदीबरोबरच तामिळ आणि तेलगु भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व भाषा मिळून पद्मावत ६००० स्क्रिन्सवर प्रदर्शित होईल. मात्र याची निश्चित संख्या माहित नाही.


पहिल्या दिवशी इतकी कमाई करण्याची शक्यता


ट्रेड सर्किलच्या नुसार पहिल्या दिवशी चित्रपट २५-३० कोटींची कमाई करू शकतो. मात्र आता कमी-जास्त होण्याची संख्या आहे. कारण लोकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता आहेच पण त्याचबरोबर भीतीही आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणावरून ते सिनेमागृहाकडे जाणे टाळू शकतात. मात्र एक प्लस पॉईंट हा आहे की, चित्रपट प्रदर्शनानंतर लॉन्ग विकेंड येत आहे.