मुंबई : वादविवादांचा अडथळा पार करून 'पद्मावत' हा सिनेमा अखेर 25 जानेवारीला रिलीज झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका पादुकोण, शाहीद कपूर आणि रण्वीर सिंह यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट रसिकांच्या पसंतीला उतरला आहे. 


200 कोटींचा टप्पा पार 


संजय लीला भंसाळी दिग्दर्शित या चित्रपटाला सुरूवातीपासूनच प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला होता. मात्र वाद विवादांचे अडथळे पार करून, चित्रपटाच्या नावामध्ये, चित्रपटामध्ये काही बदल करून 'पद्मावत' रसिकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाने बघता बघता कोटींचा पल्ला पार केला. ट्रेड अ‍ॅनालिस्ट रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मावतने रविवारी 200 कोटींचा पल्ला पार केला आहे. 


 




कलाकार, दिग्दर्शकासाठी आनंदाची बातमी  


शाहीद कपूर, रणवीर सिंह आणि संजय लीला भंसाळी यांना या चित्रपटामुळे एक गूडन्यूज मिळाली आहे. 200 कोटींच्या क्लबमध्ये सहभाग झाल्याने शाहीद कपूर, रणवीर सिंह आणि संजय लीला भंसाळी यांचा 200 कोटी कमावलेला हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. 


दीपिकाला मात्र हा मान तिसर्‍यांदा मिळाला आहे. 'चेन्नई एक्सप्रेस', 'हॅप्पी न्यू ईयर' नंतर 'पद्मावत' हा चित्रपट 200कोटींची कमाई करणारा दीपिकाचा तिसरा चित्रपट ठरला आहे. 200  कोटींंचा पल्ला पार करणारा 'पद्मावत' हा 15 वा सिनेमा हिंदी सिनेमा आहे. 



देशा-परदेशातही तुफान प्रतिसाद  


'पद्मावत' चित्रपटाला देशामध्ये काही ठिकाणी अजूनही प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला नाही. पण परदेशात अनेक ठिकाणी हा चित्रपट रसिकांची दाद मिळावत आहे.