मुंबई : अखेर संजय लीला भन्साळीच्या पद्मावत या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. आता हा सिनेमा अक्षय कुमारच्या पॅडमॅन आणि मनोज वाजपेयी - सिद्धार्थ मल्होत्राच्या अय्यारी या सिनेमाशी जोरदार टक्कर करणार आहे. 1 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र त्यानंतर या सिनेमाच्या अनेक रिलीज डेट समोर आल्या 


बॉक्स ऑफिसवर होणार जोरदार टक्कर 


26, 27 आणि 28 असा लाँग विकेंड असल्यामुळे पद्मावत आणि पॅडमॅन या सिनेमांनी आशा ठेवली आहे. लाँग विकेंड असल्यामुळे हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतील अशी अपेक्षा दोघांना देखील आहे. अक्षय कुमारने मीडियाला सांगितल्या नुसार, या सिनेमांच्या प्रदर्शनावरून कोणतीही स्पर्धा नाही. हा मोठा दिवस आहे. लाँग विकेंड असल्यामुळे या दिवशी खूप सिनेमे प्रदर्शित होत आहेत. 


अजूनही पद्मावतला होणार विरोध थांबलेला नाही 


सेंसर बोर्डाने जरी संजय लीला भन्साळीच्या पद्मावतला हिरवा झेंडा दाखवला असला तरीही त्याच्याशी संबंधीत असलेला वाद अद्याप शमलेला नाही. हा सिनेमा अगदी सुरूवातीपासून करणी सेनेच्या रडावर होता. या सिनेमाला करणी सेनाने कडाडून विरोध केला होता. जर हा सिनेमा प्रदर्शित झाला तर त्या विरोधात देशभरात प्रदर्शन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.