मुलांनी काढल घराबाहेर, `पाकिजा` सिनेमातील अभिनेत्रीचा मृत्यू
`पाकिजा` सिनेमातून आलेल्या वयोवृद्ध अभिनेत्री गीता कपूर यांच शनिवारी सकाळी निधन झाल.
नवी दिल्ली : 'पाकिजा' सिनेमातून आलेल्या वयोवृद्ध अभिनेत्री गीता कपूर यांचं शनिवारी सकाळी निधन झालं. त्या एका वृद्धश्रमात राहत होत्या. परिवारातील त्यांच्या एका मित्राने यासंदर्भात माहिती दिली. गीता कपूर ६७ वर्षांच्या होत्या. गेल्यावर्षी त्यांचा मुलगा आणि मुलीने त्यांना घराबाहेर काढलं होतं. तेव्हापासून त्या वृद्धाश्रमात होत्या. त्यांच्या निधनानंतर निर्माता अशोक पंडित यांनी ट्विट केलंय. 'आपल्या मुलांना शेवटचं पाहण्याच्या इच्छेतच त्यांचा मृत्यू झाला, हे खूप वाईट झालं' असं त्यांनी म्हटलं. गीता यांनी १०० हून अधिक सिनेमात काम केलंय. यामध्ये 'पाकिजा' आणि 'रझिया सुलतान' सारख्या सिनेमांचा समावेश होता. मुलांनी घराबाहेर काढल्यानंतर सिनेनिर्माता रमेश तौरानी हे त्यांच्या औषधांचा खर्च करत असत.
वाईट वागणूक
कपूर यांचा मुलगा राजा हा कोरियोग्राफर असून मुलगी एअर हॉस्टेस आहे. कपूर यांना त्यांची मुलं मे २०१७ ला गोरेगावच्या एसआरवी हॉस्पीटलमध्ये सोडून गेले. पण तौरानी यांनी कपूर यांना एका वृद्धाश्रमात ठेवले. वाईट वागणूक आणि जेवण न देण्याचा आरोप त्यांनी आपल्या मुलांवर लावला.सोमवारी कपूर यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.