पेशावर : बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते शशी कपूर यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येतेय. भारतच नव्हे तर पाकिस्तानातही त्यांचे चाहते होते. मंगळवारी पाकिस्तानच्या पेशावरमध्येही श्रद्धांजली वाहण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध अभिनेता शशी कपूर यांचे निधन झाले. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार कऱण्यात आले. 


पाकिस्तानातील पेशावरमध्येही मेणबत्ती पेटवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शशी कपूर यांचे कुटुंब पेशावरमधून भारतात स्थलांतरित झाले होते. कपूर  घराण्याचे जुने घर पेशावरच्या ओल्ड सिटीमधील किस्सा खवानी बाजार येथे आहे. शशी कपूर यांच्या आजोबांनी १९१८मध्ये हे घर बांधले होते. 


पहिला सिनेमा


पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा आणि राज कपूर-शम्मी कपूर यांचे लहान भाऊ शशी कपूर यांनी बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर १९६१ मध्ये ‘धर्मपुत्र’ या सिनेमाने बॉलिवूडमध्ये सुरूवात केली होती. 


त्यांना मिळालेले पुरस्कार


शशी कपूर यांना २०११ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर २०१५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला होता. 


ब्रिटीश अभिनेत्रीसोबत लग्न


ब्रिटीश अभिनेत्री जेनिफर केंडरसोबत त्यांनी लग्न केलं होतं. जेनिफरचं १९८४ मध्ये निधन झालं. शशी कपूर यांना एक मुलगी संजना कपूर आणि दोन मुलं कुणाल-करण कपूर हे आहेत. 


कारकिर्द


शशी कपूर यांनी बालकलाकार म्हणून सिनेमांमध्ये काम सुरू केलं होतं. त्यानंतर त्यांनी हिरो म्हणून १९६१ साली आलेल्या ‘धर्मपुत्र’पासून सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी १५० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये कामे केली. त्यांचं खरं नाव बलबीर असं होतं.