पाकिस्तानमध्ये भारतीय टीव्ही शो बॅन
पाहा काय आहे
मुंबई : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने लाहोरच्या उच्च न्यायालयाचे आदेश फेटाळून लावले आहेत. स्थानीक टीव्ही चॅनलवर आता भारतीय कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. भारतीय कार्यक्रम प्रसारण करण्यास मनाई केली आहे.
मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांनी युनायटेड प्रोड्युसर्स असोसिएशन द्वारे सर्वोच्च न्यायालयाने कराजी रजिस्ट्रीमध्ये स्थानिक टीव्ही चॅनलवर विदेशी कार्यक्रम दाखवण्यासंबंधी एका याचिकेवर हे आदेश दिले आहेत. त्यांनी भारतीय कार्यक्रमांवर बंदी आणत, हे कार्यक्रम आपल्या संविधानाचे उल्लंघन करत आहे. तसेच आपण आपल्या चॅनलवर प्रतिबंध आणू शकत नाही का? असा प्रश्न विचारला आहे.
रिपोर्टनुसार, न्यायाधीशांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांना फक्त चांगल्या गोष्टी प्रसारित करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानी इलेक्ट्रॉनिक मीडिया रेगुलेटरी अथॉरिटीने 2016 मध्ये स्थानीक टीव्ही आणि एफएम रेडिओ चॅनलवर भारतीय कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी आणली आहे.