स्वत:ची हुबेहूब माधुरी दीक्षित, काजोल, श्रीदेवी, ऐश्वर्या पाकिस्तानकडे, फोटो तर पाहा
परराष्ट्रातील अभिनेत्रींनाही बी- टाऊनच्या सौंदर्यवतींचा हेवा वाटतो
मुंबई : आपणंही एका अभिनेत्रीप्रमाणं दिसावं असं तरुणींना अनेकदा वाटतं. मग एखाद्या आवडीच्या अभिनेत्रीसारखा लूक रिक्रिएट करण्यासाठीचे प्रयत्नही केले जातात. बॉलिवूडच्या अभिनेत्री आणि त्यांचं सौंदर्य सर्वांनाच घायाळ करतं. अगदी परराष्ट्रातील अभिनेत्रींनाही बी- टाऊनच्या सौंदर्यवतींचा हेवा वाटतो. पाकिस्तानमधील अभिनेत्री याचंच एक उदाहरण आहे.
हेअरस्टाईलपासून मेकअपपर्यंत आणि पेहरावापासून अगदी दागिन्यांपर्यंत पाकिस्तानी अभिनेत्री संपूर्ण लूकची कॉपी करताना आजवर दिसल्या आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री एजा खान हिनं अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा लूक कॉपी केला होता. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात ऐश्वर्या जशी दिसली होती, अगदी तसंच दिसण्याचा प्रयत्न एजानं केला होता.
एजानं 'कुछ कुछ होता है' चित्रपटातील अभिनेत्री काजोल हिचा लूकही कॉपी केला होता. इतक्यावरच न थांबता ती माधुरी दीक्षितचा लूकही कॉपी करताना दिसली.
एजाला माधुरीच्या सौंदर्याची विशेष भुरळ पडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, तिनं 'एक दो तीन' या गाण्यातील माधुरीचा लूकही कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. गतकाळातील अभिनेत्रींचा लूक रिक्रिएट करण्यालाही एजानं पसंती दिली.
दिवंगत अभिनेत्री नूरजहाँ आणि अभिनेत्री श्रीदेवी यांचा लूकही तिनं कॅरी केल्याचं पाहायला मिळालं होतं. एजाच्या या अदा चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या.