मुंबई : साधारण गेल्या वर्षी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या फोटोंमध्ये रणबीर आणि माहिरा हे दोघंही धुम्रपान करताना दिसत होते. या फोटोंमुळे त्या दोघांवरही अनेकांनीच निराशा व्यक्त केली होती. इतकच नव्हे तर, यावरुन त्यांच्या रिलेशनशिपच्याही अफवांना उधाण आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तोकडे कपडे घातल्यामुळे आणि धुम्रपान केल्यामुळे अनेकांनीच माहिराच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्हं उपस्थित केलं होतं. माहिराने त्याचवेळी टीकाकारांना उत्तर देत सर्व अफवांना पूर्णविराम दिला होता. पण, आता पुन्हा एकदा या चर्चांनी डोकं वर काढलं आहे. 


बुधवारी माहिराने क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजच्या निवृत्तीविषयी एक ट्विट केलं. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या हाफीजविषयी तिने लिहिलं, 'अतिशय उत्कृष्ट खेळीसाठी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. तुमचा खेळ लाईव्ह पाण्याची संधी मिळाल्याचा मला फार आनंद होत आहे. कुटुंबाला आणि तुम्हाला खूप खूप प्रेम.'


तिने हे ट्विट करताच एका युजरने विषय भलतीकडेच वळवला. 'लगता है कोई खास काम नही मिल रहा जबसे रणवीर कपूरवाली पिक्चर्स आऊट हुई', असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं. त्याच्या या ट्विटकडे दुर्लक्ष न करत माहिराने अक्षरश: मोजक्या शब्दांमध्ये त्याला उत्तर दिलं. 



रणवीर, असं चुकीचं लिहित त्याने ट्विट केल्याचं लक्षात येताच माहिराने त्याची चूक लक्षात आणून दिली आणि 'रणबीर', इतकच लिहित त्याच्या ट्विटला उत्तर दिलं. माहिराने एका शब्दात उत्तर देत या चर्चांनी डोकं वर काढण्याआधीच त्यांना पूर्णविराम दिला.