Pakistani Viral Girl Video : पाकिस्तानची व्हायरल गर्ल तर तुम्हाला माहितच असेल. पण जर तुम्हाला आठवत नसेल तर 'मेरा दिल ये पुकारे आजा' या लोकप्रिय आणि क्लासिक गाण्यावर तिनं डान्स केला होता. तिच्या या डान्सनं सगळ्यांचे फक्त लक्ष वेधले नाही तर सगळ्यांची मने देखील जिंकली. फक्त पाकिस्तानात नाही तर भारतातही तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि सगळ्यांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर अनेकांनी तिच्या डान्स स्टेप या कॉपी केल्या. दरम्यान, सोशल मीडियावर या मुलीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओतील तिच्या लूकनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुन्हा एकदा या पाकिस्तानी व्हायरल गर्लचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ तिनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला एक पंजाबी गाणं सुरु आहे. तर या गाण्याचं नाव ऑब्सेस्ड असं आहे. या गाण्यात बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विकी कौशल आहे. विकी कौशलचं हे गाणं चांगलचं व्हायरल झालं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. आता पाकिस्तानी मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर पाकिस्तानी व्हायरल गर्ल अशी ओळख असणाऱ्या या मुलीचं नाव आयशा असं आहे. आयशानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ शेअर करत आयशानं कॅप्शन दिलं की मला या गाण्याचे व्यसन लागले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आयशाने तिच्या पहिल्या काही व्हिडिओंमध्ये माहिती दिली होती की ती लवकरच एक व्लॉगिंग सुरु केला होता. तर तिच्या या व्हिडीओत अनेक भारतीयांनी आम्ही तुझ्यासोबत आहोत किंवा आम्ही भारतीय देखील तुला पाठिंबा देऊ असं म्हटलं आहे. आता या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयशानं यावेळी पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून त्यावर हॅन्डवर्क करण्यात आलं आहे. 


हेही वाचा : "तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि मला...", भीषण अपघातानंतर अभिनेत्री Meera Joshi ची 'ती' पोस्ट व्हायरल


आयशानं शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यावेळी एक नेटकरी म्हणाला "भारतातून तुला प्रेम." दुसरा नेटकरी म्हणाला, "पाकिस्तानची मुलगी पंजाबी गाण्यावर व्हिडीओ करते हे सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे." तिसरा नेटकरी म्हणाला, "तुझ्या युनिक स्टाईलमध्ये या गाण्यावर डान्स का नाही केलास." आणखी एक नेटकरी म्हणाला, "कपड्यांपेक्षा तुझ्या आरोग्याकडे लक्ष दे काही खात जा."