"तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि मला...", भीषण अपघातानंतर अभिनेत्री Meera Joshi ची 'ती' पोस्ट व्हायरल

Meera Joshi Car Accident : मीरा जोशीनं तिच्या या भीषण अपघाताविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. इतकंच काय तर तिनं तिची कार म्हणजेच सखीसाठी एक खास पोस्ट पण शेअर केली आहे. यावेळी मीरा जोशीनं त्यांनी एकत्र किती प्रवास केला ते काय काय केलं ते सांगितलं. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 12, 2023, 01:38 PM IST
"तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि मला...", भीषण अपघातानंतर अभिनेत्री Meera Joshi ची 'ती' पोस्ट व्हायरल title=
(Photo Credit : Social Media)

Meera Joshi Car Accident : मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी ही तिच्या भन्नाट चित्रपटांसाठी ओळखली जाते. 'अगंबाई अरेच्चा 2' या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी मीरा ओळखली जाते. मीरा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत राहते. मात्र, सध्या मीरा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचा नुकताच झालेला अपघात. मीरानं स्वत: तिच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. तिच्या गाडीला गंभीर अपघात झाला असून त्याचं खूप जास्त नुकसानही झालं आहे. 

मीरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मीरानं तिच्या गाडीचे काही जुने व्हिडीओ शेअर केले आहेत. याशिवाय तिच्या या व्हिडीओत अखेर तिनं तिच्या गाडीची अपघात झाल्यानंतर कशी परिस्थिती होते हे देखील दाखवलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत मीरा म्हणाली 'क्रॅश्ड अँड मिसिंग' असं कॅप्शनही दिलं. गाडीचा उल्लेख तिने सखी असा केला असून मीरा पुढे म्हणाली की, 'प्रिय सखी, किती आणि कुठे-कुठे भटकलो ना आपण. रात्र-दिवस, ऊन- पाऊस, चढ- उतार काहीही असो आपण एकमेकींची काळजी घेतली. पण आज इतका भीषण अपघात होऊनही तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि मला किरकोळ ओरखडाही येऊ दिला नाहीस. धन्यवाद. प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. तब्बल 90 हजार मैलांचा आपला प्रवास. गमावलं ना मी तुला. आता विश्रांती घे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मीराच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी ती आता सुखरुप आहे की नाही याची विचारपूस केली. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, तू ठीक आहेस ना? दुसरा नेटकरी म्हणाला, तुला लागलं तर नाही ना? तिसरा नेटकरी म्हणाला, काळजी घे स्वतःची. सांभाळून गाडी चालव. अशा अनेक कमेंट करत मीराला तिची काळजी घे असं अनेकांनी सांगितलं आहे. 

हेही वाचा : लोकप्रिय अभिनेत्री Rubina Dilaik च्या गाडीला अपघात, पती अभिनवनं कारचा फोटो शेअर करत, म्हणाला...

मीरा नाही तर मीरा आधी आणखी दोन अभिनेत्रींचं लागोपाठ अपघात झाला. सगळ्यात आधी स्नेहलचा अपघात झाला होता. तिच्या गाडीचा हा अपघात परवा झाला होता. तर दुसरा अपघात हा काल झाला. हा अपघात हिंदी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री रिबुका दिलैकचा झाला आहे. तिच्या अपघातानंतर तिचा नवरा अभिनवनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली होती. कलाविश्वात एकामागे एक असे तीन दिवस झालेला हा तिसरा अपघात आहे.