Palak Tiwari - Ibrahim Ali Khan PArty Pics:  टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची  मुलगी ( Shweta Tiwari Daughter ) पलक तिवारी आणि सैफ अली खानचा ( Saif Ali khan Son ) मुलगा इब्राहिम पुन्हा एकदा सोबत दिसले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांची चर्चा आहे. यापूर्वीही ते दोघे एकत्र दिसल्याने दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगलं आहे. पण आता पुन्हा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. (palak tiwari and ibrahim ali khan relationship)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पलक आणि इब्राहिम यांना 11 डिसेंबर रोजी एका कॉन्सर्टमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आलं.  समोर आलेल्या फोटोंमध्ये पलक आणि इब्राहिमसोबत त्यांचे मित्रमंडळी देखील दिसत आहेत. या कॉन्सर्टचे फोटो जान्हवी कपूरचा मित्र ओरहन अवत्रमणीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. (palak tiwari age)



फोटोंमध्ये ओरहन पलक आणि इब्राहिम (palak tiwari father) दोघांसोबत पोज देताना दिसत आहे. तिघांचा फोटो अमेरिकन रॅपर मेलोनच्या मुंबईतील कॉन्सर्टचा आहे. या कॉन्सर्टमध्ये ओरहन, पलक आणि इब्राहिम यांच्या शिवाय अन्य सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. 



अमेरिकन रॅपर मेलोनच्या  कॉन्सर्टमध्ये अभिनेता सुनील सेट्टीचा मुलगा अहान सेट्टी, कार्तिक आर्यन, विजय वर्मा, तमन्ना भाटिया, मलायका अरोरा आणि मृणाल ठाकूर यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. (ibrahim ali khan gf)


पलकबद्दल सांगायचं झालं तर, आई श्वेताप्रमाणेच (shweta tiwari daughter) पलक देखील मनोरंजन विश्वात सक्रिय झाली आहे. लवकरच तिचा बॉलिवूड चित्रपट ‘रोझी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरीकडे इब्राहिम देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पण पलक आणि इब्राहिम त्यांच्या नात्यामुळे अधिक चर्चेत असतात. (ibrahim ali khan age)