Palak Tiwari : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिची लेक पलक तिवारी हे दोघे ही त्यांच्या फिटनेससाठी ओळखल्या जातात. त्या दोघींना एकत्र पाहिलं की कोणाला ही त्या आई-मुलगी वाटणार नाहीत. तर मैत्रिणी किंवा बहिणी वाटतील.. श्वेता आणि पलक या दोघी सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या दोघी चाहत्यांच्या संपर्कात राहतात. पलकनं नुकताच एक व्हिडीओ शेअर करत आई श्वेताविषयी खूप मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पलकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पलक आणि श्वेता या दोघी जीममध्ये असल्याचे पाहायला मिळते. पलकनं काळ्या रंगाचा ब्रा आणि टाईट्स परिधान केली आहे. तर श्वेतानं निळ्या रंगाचं लूज टी-शर्ट आणि निळ्या रंगाचीच टाईट्स परिधान केली आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला पलक ही मिररमध्ये बघत असून एक व्हिडीओ शूट करताना दिसते. या व्हिडीओच्या सुरुवातीला पलक म्हणते की 'आज मी तुमच्यासोबत माझ्या दिवसभरातील रुटीनविषयी सांगणार आहे. जशी की मी मेहनती आहे. माझ्या आई कमी मेहनती किंवा आळशी आईसोबत जीममध्ये आली होती. जी सेट करत असताना मध्येच खूप वेळ वाया घालवते.' पलक हा व्हिडीओ काढते हे पाहता श्वेता हसू लागते. त्यावर लगेत पलक बोलते की 'बघा, परत हसू लगाली. पलक त्यानंतर श्वेताला बोलते की आई प्लीज कधी तू गंभीर होऊ शकतेस का?' पुढे व्हिडीओत पलक हसताना दिसते आणि ती ज्या मशीनवर वर्कआऊट करत असते ते सोडते. पलकचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत आणि नेटकरी त्या दोघींची स्तुती करत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : बॉडी मसाज करून घेताना विद्या बालनला आला वाईट अनुभव; म्हणाली 'माझ्या डोळ्यात पाणी आलं...'


दरम्यान, पलक तिवारी विषयी बोलायचे झाले तर तिनं सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर तिच्याकडे आणखी अनेक प्रोजेक्ट्स असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पलक आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. ते दोघे अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहेत. पलक ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे.