Vidya Balan : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्या बालन ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ती ओळखली जाते. विद्याच्या या स्पष्ट वक्तव्याचे लाखो चाहते आहेत. विद्याही आता भारतीय केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाची सदस्य आहे. विद्या आज यशाच्या शिखरावर असली तरी देखील तिनं करिअरच्या सुरुवातीपासून खूप स्ट्रगल केलं होतं. त्यात आजही अनेकदा विद्याला तिच्या वाढत्या वजनावरूव सोशल मीडियावर तिला अनेकदा ट्रोल करण्यात येतं. ते फक्त सोशल मीडियावर नाही तर इतर ठिकाणी देखील तिला ट्रोल करण्यात येत. आता विद्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे.
विद्यानं ही मुलाखत नुकतीच लाइफस्टाइल कोचला दिली होती. या मुलाखतीत विद्या बालनं तिच्यावर करण्यात आलेल्या कमेंट विषयी सांगितले आहे. विद्या अनेकदा याविषयी बोलली आहे की तिला तिचं शरीर मुळीच आवडायचं नाही. पण आता तिनं तिच्या शरिराला जसं आहे तिसं स्विकारले आहे. त्यासोबत तिनं स्वत: वर प्रेम करण्यास सुरुवात केली आहे. याविषयी बोलताना विद्यानं अशा एका अनुभवाविषयी सांगितलं ज्यात तिच्या वाढत्या वजनावरून काहीही वक्तव्य केलं होतं.
विद्या बालननं सांगितलं की एकदा एका मसाज करणाऱ्या व्यक्तीनं तिच्या वाढत्या वजनावर कमेंट केली होती. ज्यानंतर विद्या खूप रडली होती. विद्यानं सांगितलं की नुकतीच ती एकदा मसाज करण्यासाठी गेली होती. जिथे मालिश करत असलेल्या महिलेनं तिला विचारले की पुन्हा वजन वाढलं. याविषयी सविस्तर सांगत विद्या म्हणाली की 'मी मसाज करत होते आणि ती महिला मला म्हणाली की अरे परत वजन वाढलं काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळ्यात इंटिमेट जागा असते, मी विश्वास करून तिच्याकडून मसाज करून घेत होती. मी तिच्याकडून माझ्या शरीरावर कमेंट करून घेण्यासाठी तिथे थांबली नव्हती. मी तिथे यासाठी आली होती की माझ्या नर्व्स रिलॅक्स होतील आणि मला चांगलं वाटेल. मी तिला म्हटलं की माझ्या शरिरावर कमेंट करू नको, मला आवडतं नाही.'
हेही वाचा : अख्ख जग नाना म्हणतं पण त्यांचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?
या संपूर्ण प्रकरणाचा विद्यावर खूप जास्त परिणाम झाला. विद्या पुढे म्हणाली की 'या घटनेनंतर ती तिच्या पतीला भेटली आणि खूप रडली. त्यावेळी तिनं हे देखील सांगितलं की ती आधी पासून त्या आठवड्यात मी टेन्शनमध्ये होते आणि रिलॅक्स करण्यासाठी मसाज करायला गेले होते. पण त्यानंतर तिला तिच्या शरिरावर करण्यात आलेल्या कमेंटचा सामना करावा लागला. हे तिच्यासाठी खूप वाईट होतं.'