मुंबई : पनामा पेपर्स प्रकरणी बच्चन कुटुंबियांनी अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) आपल्या व्यवहाराची कागदपत्रे  दिलीत. त्यामुळे आता काही आर्थिक व्यवहार करताना काही घोटाळा झालाय का, याची पाहणी करण्यात येणार आहे. अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांना ईडीने चौकशीची नोटीस बजावली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनामा पेपर्समध्ये  अमिताभ, ऐश्वर्या यांची नावे आली होती. यामुळे त्यांच्या पाठीमागे ईडीची चौकशी लागली होती. मंगळवारी बच्चन कुटुंबीयांनी काही आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे ईडीला सादर केलीत. पनामा पेपर्समध्ये ज्यांची नावे उघड झाली आहेत, अशा एकूण ३३ जणांविरोधात आयकर विभागाने कारवाई सुरु केलेय.


दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना या पनामा पेपर्समुळे आपले पद सोडावे लागले. आता भारतातही चौकशी सुरु झालेय. पनामा प्रकरणात बॉलिवूड स्टार आणि काही राजकीय नेते , बड्या लोकांचा समावेस आहे.