`पंचायत` फेम अभिनेत्यानं सैफ आणि करीनाच्या रिसेप्शन पार्टीत केलं होतं वेटरचं काम! मग नोकरी सोडली अन्...
Asif Khan Panchayat : आसिफ खाननं कधी केलं होतं सैफ अली खान आणि करीना कपूरच्या रिसेप्शन पार्टीत वेटरचं काम....
Asif Khan Panchayat : 'मिर्जापुर', 'पंचायत', 'पाताल लोक', 'पगलैट' आणि 'ह्यूमन' सारख्या ओटीटी सीरिजमध्ये काम करून स्वत: चं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्याला आज सगळेच ओळखतात. आता आपण कोणत्या अभिनेत्याविषयी बोलतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर 'पंचायत' मध्ये त्याचा 'गज्जब बेज्जती है यार' हा डायलॉग चांगलाच हिट झाला आहे. आजही त्याचा हा डायलॉग सोशल मीडियावर चर्चेत असतो. खरंतर, अभिनयाच्या जगात स्वत: चं स्थान निर्माण केलं आहे. त्याच कलाकारानं त्याच्या करिअरमध्ये स्ट्रगल सुरु असताना करीना कपूर खान आणि सैफ अली खानच्या लग्नात काम केलं आहे.
या अभिनेत्याचं नाव आसिफ खान आहे. त्यानं अभिनेता होण्यासाठी खूप स्ट्रगल केलं. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत असिफनं त्याच्या या सगळ्या स्ट्रगलविषयी सांगितलं आहे. त्यानं सांगितलं की स्वप्नांच्या या शहरात स्वत: चं स्थान निर्माण करणं सोपं नव्हतं. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर सगळे खर्च उचलण्यासाठी तो छोटी-मोठी कामं करु लागला. 2010 मध्ये त्यानं त्याच्या आईकडून त्याला अभिनयात करिअर करण्यासाठी परवनागी द्यावी यासाठी तिची समजूत काढली.
पुढे याविषयी सांगत असिफ खाननं सांगितलं की त्यानं एका हॉटेलमध्ये वेटर म्हणूनकाम केलं. काही महिन्यांनंतर जेव्हा तो किचन डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. हॉटेलमध्ये एक पार्टी होती, ती पार्टी ही बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानची रिसेप्शन पार्टी होती. या गोष्टी आठवत त्यानं खूप काही सांगितलं.
आसिफनं सांगितलं की 'स्वत: ला इथे टिकवून ठेवण्यासाठी मी एक हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणं सुरु केलं होतं. काही महिन्यांनंतर जेव्हा मी किचनच्या सेक्शनमध्ये काम करत होतो, आम्ही एक पार्टी पाहिलीजी सैफ अली खान आणि करीना कपूरची रिसेप्शन पार्टी होती.'
हेही वाचा : मल्लिका शेरावतनं अभिनेत्यावर केला गळा दाबण्याचा आरोप, 20 वर्षांनंतर अभिनेत्यांचाच मोठा खुलासा
त्यानंतर काही काळात आसिफनं नोकरी सोडली आणि एका मॉलमध्ये काम करणं सुरु केलं. त्याच दरम्यान, तो ऑडिशन देण्यासाठी जायचा आणि जयपुर, राजस्थानमध्ये एका थिएटर ग्रुपमध्ये काम करु लागला. लवकरच त्यांनी कास्टिंग असिस्टंटच्या रुपात काम करणं सुरु केलं आणि 'टॉयलेट: एक प्रेम कथा', 'परी', 'पगलैट' अशा अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या.