मल्लिका शेरावतनं अभिनेत्यावर केला गळा दाबण्याचा आरोप, 20 वर्षांनंतर अभिनेत्यांचाच मोठा खुलासा

Mallika Sherawat Accused actor Of Choking Her : मल्लिका शेरावतनं या अभिनेत्यावर केला होता गळा दाबण्याचा आरोप... अखेर इतक्या वर्षानंतर खुलासा करत अभिनेतानं सांगितलं सत्य

दिक्षा पाटील | Updated: Jun 9, 2024, 02:14 PM IST
मल्लिका शेरावतनं अभिनेत्यावर केला गळा दाबण्याचा आरोप, 20 वर्षांनंतर अभिनेत्यांचाच मोठा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Mallika Sherawat Accused actor Of Choking Her : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलचा भाऊ आणि अभिनेता अश्मित पटेलनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्याला अपेक्षे एवढे यश मिळालं नाही. तो त्याच्या करिअरमध्ये स्ट्रगल करत राहिला आणि आता देखील त्याच्याकडे कोणता चित्रपट नाही. अश्मित पटेल सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे.  आता देखील अश्मित पटेल एका मुलाखतीला घेऊन चर्चेत आहे. ज्यात त्यानं मल्लिका शेरावत आणि मर्डर या चित्रपटाविषयी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. अश्मित पटेलनं दावा केला होता की मर्डरच्या प्रमोशन दरम्यान मल्लिका शेरावतनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 

अश्मित पटेनं सिद्धार्थ कननशी बोलताना सांगितलं की मल्लिका शेरावातला 'पीआर गेम' खूप चांगल्या प्रकारे माहित आहे. तिला त्याविषयी माहित आहे आणि बॉलिवूडमध्ये जेव्हा पब्लिसिस्ट नव्हते , तेव्हा मल्लिकानं तिचा पर्सनल पब्लिसिस्ट ठेवला होता. अश्मितच्या म्हणण्याप्रमाणे 'मर्डर' च्या प्रमोशन दरम्यान, त्याला आणि इमरान हाश्मीला एका साईडला केलं होतं.  

अश्मित पटेलनं याविषयी देखील सांगितलं ज्यानंतर मल्लिका शेरावतनं त्याचा गळा दाबला होता. पण जेव्हा महेश भट्ट आले तेव्हा त्यांनी येऊन अभिनेत्यांना सांगितलं की जाऊन मल्लिकाची माफी मागा. ते म्हणाले, 'चित्रपटात आमचं लग्न आमच्या सोयीनुसार झालं होतं. मी मेथड अॅक्टिंग करण्याचा प्रयत्न केला आणि मल्लिकाच्या भूमिकेपासून काही अंतर राखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सेटवर तिनं माझ्याशी दोन-तीन वेळा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी थोडं लांब झालो. मी असभ्य होण्याचा प्रयत्न करत नव्हतो, परंतु मैत्री व्हावी याचा प्रयत्नही मी करत नव्हतो, जेणेकरून मी आमच्यातील तणाव वैयक्तिकरित्या ठेवू शकेन आणि ते कॅमेऱ्यावर नीट दिसून येईल. कदाचित तिला ते समजलं नसेल, किंवा कदाचित मी तिला किंवा दिग्दर्शक अनुराग बासूला हे सांगायला हवं होतं.'

अश्मित पटेलनं पुढे सांगितलं की 'एक सीन होता, जिथे मला तिचा गळा दाबायचा होता. मी एकदा नसीरुद्दीन शाहला विचारलं होतं की कॅमेऱ्यावर कोणाचा गळा दाबण्याचा सीन करण्याची पद्धत काय आहे आणि त्यांनी मला एक टेकनिक शिकवली. त्यामुळे असं वाटेल की तुम्ही तुमच्या सगळ्या शक्तीचा वापर करत आहात. पण खरंतर तुम्ही तुमच्या सह-कलाकाराला नुकसान देत नसता. पण शॉट संपल्यानंतर तिनं त्याला थोडा मुद्दा बनवला होता. भट्ट साहेब माझ्याशी बोलायला आले आणि मला म्हणाले की मल्लिकाशी माफी माग. मी म्हणालो की पण मी काही केलंच नाही, चला मॉनिटरमध्ये पाहुया आणि जर तुम्हाला वाटतंय की मी तिचा गळा दाबतोय, तर मी माफी मागेन. पण जर नसेल तर तिला माझी माफी मागावी लागेल. पण मला माफी मिळाली नाही. ' 

हेही वाचा : आमिर खानच्या मुलाच्या 'महाराज' चित्रपटावर बजरंग दलाचं सावट! पत्र लिहून नोंदवला आक्षेप अन् ठेवली 'ही' मागणी

'मर्डर' एक इरॉटिक थ्रिलर चित्रपट होता. हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर होती. त्यानंतर इमरान हाश्मीकडे चित्रपटांची लाइन लागली होती. अश्मितनं अनेक चित्रपट केले. मात्र, काही वर्षात मल्लिका शेरावत ही चित्रपटांपासून लांब गेली.