मुंबई : प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेत वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. न्यूजर्सी येथे असलेल्या पंडित जसराज यांना काल रात्री थोडा त्रास जाणवू लागला. पद्मविभूषण ख्यातनाम गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेतील न्यूजर्सी येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.  आपल्या गायकीने अनेक वर्ष देश विदेशातील चाहत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्रीय संगीतातील 'मेवाती' घराण्याशी संबंध असलेल्या पंडित जसराज यांच्या निधनामुळे शास्त्रीय गायन क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. पंडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी झाला. पंडित जसरात हे ८० वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. 



पंडित जसराज यांच्या नावाने अंतराळात एक ग्रहसुद्धा आहे. आंतरराष्ट्रीय संघाने मंगळ आणि गुरू ग्रहांच्यामध्ये असलेल्या एका ग्रहाचे नाव पंडित जसरात असं ठेवलं आहे. असा मान मिळवणारे ते पहिले भारतीय कलाकार आहेत.