मुंबई : येत्या आठवड्यात थुकरट वाडीत पानिपत या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेत्री कीर्ती सनन आणि संगीतकार अजय-अतुल हजेरी लावणार आहेत. चला हवा येऊ द्या च्या मंचावर हे कलाकार येणार म्हंटल्यावर थुकरट वाडीतील विनोदवीरांनी एकच कल्ला केला. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'स्वदेश' या चित्रपटावर एक विनोदी स्किट सादर केलं. या स्किटला आशुतोष गोवारीकर यांनी भरभरून दाद दिली. धमाल मस्तीने भरलेला हा भाग प्रेक्षक २ आणि ३ डिसेंबरला पाहू शकतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशुतोष गोवारीकरांकडून अरविंद जगताप यांचं कौतुक


पानिपतचा 'विश्वास' या विषयावर सद्या परिस्थिती आणि चालू घडामोडींवर आधारित एक ज्वलंत पत्र पोस्टमन काका म्हणजे सागर कारंडे याने वाचलं. ते पत्र ऐकून आशुतोष गोवारीकर भारावून गेले. इतकंच नव्हे तर त्यांनी या पत्राला दाद देत अरविंद जगताप ज्यांनी हे पत्र लिहिलं त्यांचं देखील खूप कौतुक केलं. या पत्रात असं काय लिहिलं होत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चला हवा येऊ द्याचा २ आणि ३ डिसेंबरचा ऐपिसोड पाहावा लागणार आहे.