Paras Chhabra On His Weight Gain : सेलिब्रिटी हे नेहमीत त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांचे ब्रेकअप त्यांच्या रिलेशनशिपविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. दरम्यान, प्रत्येक व्यक्तीला ब्रेकअप झाल्यानंतर जसा त्रास होतो तसाच त्रास त्यांनाही होतोच. दरम्यान, ‘बिग बॉस’ फेम पारस छाबराचा गर्लफ्रेंड माहिरा शर्माशी ब्रेकअप झाल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. पण त्यावर पारस किंवा मग माहिरा कोणीही काही वक्तव्य केलेलं नाही. नुकतंच पारसनं वृदांवनमध्ये नवीन घर खरेदी केलं आहे. त्याचे फोटो पारसनं शेअर केले होते. तर एका मुलाखतीत पारसनं त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. अशात Anxiety मुळे त्याचं वजन वाढलं आणि त्यामुळे त्याला काम मिळत नसल्याचं त्यानं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पारसनं नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत पारसनं त्याच्या वाढलेल्या वजनाविषयी सांगितलं आहे. पारस म्हणाला, 'माझ्या वजनामुळे मला अनेक प्रोजेक्ट्सला नाही म्हणावे लागले. मी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही महिन्यांपूर्वी माझं वजन हे 125 किलो होते, जे माझ्या सामान्य वजनापेक्षा खूप जास्त होतं. त्यामुळे मला श्वास घेण्यासही  त्रास होऊ लागला आणि नंतर मला रक्तदाबाचा त्रासही सुरू झाला. मला जास्त व्यायामही करता येत नव्हता. पण हळूहळू मी ट्रेनरच्या मदतीने माझा स्टॅमिना वाढवला आणि आता माझे वजन 108 किलो झालं आहे.'



पुढे याविषयी सांगत पारस म्हणाला, 'तुम्हाला माझ्याकडे पाहून माझं वाढलेलं वजन दिसणार नाही. कारण माझी उंची ही 6 फूट आहे. पण या वाढलेल्या वजनाचा माझ्यावर खूप परिणाम होत आहे. त्यामुळे मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मला हे वाढलेलं वजन जाणवू लागलं होतं. माझं वजन हे नेहमीच 90 किलोच्या आसपास होतं. त्यात मी पंजाबी म्हणून माझं वजन कधी कमी झालचं नाही. त्यात जेवणाची माझी आवडं. माझं आता टार्गेट हे 90 किलो आहे आणि मी लवकरच तिथं पर्यंत पोहोचणार.'


हेही वाचा : What!!! डान्स शोच्या स्पर्धकाला सलमानमुळं मिळालं 1.2 कोटींचं मानधन, पाहा कोण आहे 'तो' नशिबवान


पुढे पारस पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार असल्याचे सांगत म्हणाला, 'लवकरच मी तुम्हाला भेटायला येणार आहेत. माझ्याकडे काही ऑफर आहेत, त्यापैकी तीन टीव्ही शोच्या आहेत आणि दोन वेब सीरिजच्या आहेत. पण माझ्यासाठी सर्वात रोमांचक ऑफर शो होस्ट करण्याची आहे. त्या प्रोजेक्टसाठी मी प्रार्थना करत आहे.'