Nach Ga Ghuma First Day Box Office Collection : परेश मोकाशी दिग्दर्शित बहुचर्चित 'नाच गं घुमा' हा चित्रपट बुधवारी महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधत 1 मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून मोलकरीणींचे भावविश्व उलगडण्यात आले आहे. या चित्रपटाचे पोस्टर, गाणी आणि ट्रेलरचा प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. यानंतर आता नाच गं घुमा या चित्रपटालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता नुकतंच या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक स्त्री आणि तिचं विश्व काही औरचं असतं आणि अशाच बाईपणाची गोष्ट 'नाच गं घुमा' या चित्रपटाद्वारे दाखवली जात आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये सुरुवातीला प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते, असे डायलॉग पाहायला मिळत आहेत. मोलकरीण हा म्हटला तर छोटा पण कधी कधी तो सर्वात महत्त्वाचा विषय ठरतो. याच गोष्टी या ट्रेलरमधून येतात आणि मोलकरीण रजेवर गेली किंवा काम सोडून गेली तर काय धर्मसंकट ओढवते त्याची झलक या चित्रपटातून पाहायला मिळत आहे. 


'नाच गं घुमा' चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई किती?


'नाच गं घुमा' हा चित्रपट बुधवारी 1 मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. 'नाच गं घुमा' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2.13 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट मराठी चित्रपटांमध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. तसेच या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 



दरम्यान ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे लेखन मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी हा निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. ‘नाच गं घुमा’ची निर्मिती परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत व तिचा पती तेजस देसाई यांनी केली आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण वितरणाची जबाबदारी ‘पॅनोरमा स्टुडीओज’ने स्विकारली आहे.