परिणीती-राघव चड्डा यांचं होणार दोन ठिकाणी रिसेप्शन!
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत उदयपूर, राजस्थानमध्ये 7 फेरे घेतले आहेत. आता दोघंही पती-पत्नी आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.
मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचं लग्न नुकतंच मोठ्या थाटामाटात पार पडलं. आता दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन होणार आहे. या नवविवाहित जोडप्याचं दोन ठिकाणी रिसेप्शन होणार आहे. रिसेप्शननंतर परिणीती तिच्या आगामी 'मिशन रानीगंज' या चित्रपटाचं प्रमोशन सुरू करणार आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत उदयपूर, राजस्थानमध्ये 7 फेरे घेतले आहेत. आता दोघंही पती-पत्नी आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. याशिवाय हरभजन सिंग पत्नी गीता बसरा आणि मुलांसह उपस्थित होता. याशिवाय सानिया मिर्झा आणि मनीष मल्होत्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनीही या लग्नाला पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. राघव आणि परिणीतीचं लग्न उदयपूरच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये पार पडलं.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या हाय-प्रोफाइल लग्नात, बॉलिवूडचा एकही मोठा स्टार लग्नाला उपस्थित नव्हता. परिणिती चोप्राने तिच्या लग्नाचे रूपांतर भव्य प्रकरणामध्ये केलं असेल, परंतु तिने फक्त जवळच्या आणि खास मित्रांना आमंत्रित केले. तिच्या खास दिवशी तिच्या जवळच्या मित्रांनी हजेरी लावावी अशी तिची इच्छा होती.
सूत्रांनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी मित्रांसाठी दोन रिसेप्शन आयोजित केले आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ''नवविवाहित जोडपं दोन रिसेप्शनचं आयोजन करतील. हे रिसेप्शन रात्री होणार आहेत. एक दिल्लीत आणि दुसरं मुंबईत."
सूत्रांच्या माहितीनुसार पुढं सांगितलं की, "दिल्लीच्या रिसेप्शनमध्ये अनेक राजकारणी असतील, जे राघव चढ्ढा यांच्या जवळचे असतील. तर मुंबईत परिणीतीने तिच्या फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांना आमंत्रित केलं आहे." परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला उपस्थित असलेले पाहुणे रात्रभर लग्नाच्या ठिकाणी थांबले होते. सूत्रांनी सांगितलं की, ''सर्व पाहुण्यांनी रात्री मुक्काम करण्याची योजना आखली होती. दोन्ही मुख्यमंत्री सोमवारी राजस्थानी नाश्ता करतील आणि आपापल्या राज्यांसाठी रवाना होतील.
याशिवाय सोमवारी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाही उदयपूरहून निघणार आहेत. 'मिशन रानीगंज' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी परिणीती चोप्रादेखील पूर्णपणे तयार असल्याचं बोललं जात आहे.'मिशन रानीगंज' 6 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात अक्षय कुमारसोबत परिणीती आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी परिणीती तिचा हनीमून पुढे ढकलण्याचा विचारही करू शकते.