Parineeti Chopra Viral Video : नुकतंच अभिनेत्री परिणीती चोप्राचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटा-माटात पार पडला. अभिनेत्रीने आप नेते राघव चढ्ढासोबत लग्न केलं.  या लग्नाचे अनेक फोटो व्हिडीओ अभिनेत्री सोशल मीडियावर सतत शेअर करत आहे. लग्नानंतर अभिनेत्रीचं सासरी भव्य स्वागत करण्यात आलं. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा हा व्हिडिओ फोरफोल्डपिक्चर्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे ज्यांनी या जोडप्याच्या लग्नाची फोटोग्राफी केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राघव चढ्ढा यांच्या फॅमिलीने नववधू परिणीतीच्या स्वागतासाठी त्यांचं घर सुंदरपणे सजवलं होतं. यासाठी त्यांनी पांढऱ्या रंगाच्या फुलांचा वापर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला परिणीती चोप्रा पतीचा हात धरून नवीन घरात प्रवेश करत आहे. यावेळी तिच्यासाठी फटाके व ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत केलं गेलं.  यानंतर परीने तिच्या सासरच्या घराच्या दारावर कुंकुवाच्या हाताचे ठसे लावले. हे विधी पार पाडताना परिणीती खूप आनंदी दिसतेय. परिणितीच्या हातचे ठसे घेतल्यानंतर तिच्या सासूने सुनेची आरती करून घरात नवीन सुनेचं स्वागत केलं आणि परिणीतीच्या कपाळावर तिलक लावला.


यानंतर परिणीती पूर्ण विधी करून घरात प्रवेश करते. प्रथम ती तिच्या पायाने दारात ठेवलेलं माप ओलांडते.  मग कुंकवाच्या ताटात आपले पाय ठेवते आणि ती घरामध्ये प्रवेश करते. या विधीनंतर पुढे  अनेक ताटं जमिनीवर ठेवल्या जातात आणि नवीन सुनेला आवाज न करता त्या उचलून घ्यायला सांगतात.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


जेव्हा परिणीती हा विधी सुरू करते, तेव्हा राघव गमतीने तिला काठी दाखवतो आणि म्हणतो चला कामाला लागा.  त्यानंतर हे जोडपं एक मजेदार खेळही खेळतात. ज्यामध्ये दोघांना एकमेकांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी परिणीती चोप्रा आपल्या वडिलांना मिठी मारून भावूक झालेली दिसत आहे. वडिलांसोबतचे परीचं हे बाँडिंग सर्वांची मने जिंकत आहे.


अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा 24 सप्टेंबरला राजस्थानमध्ये अतिशय थाटामाटात पार पडला. खास पाहुण्याच्या उपस्थितीत परिणीची आणि राघव यांनी यावेळी लग्नगाठ बांधली.