मुंबई : किंग ऑफ पॉप या नावाने जगप्रसिद्ध असलेल्या अमेरिकी गायक आणि डान्सर मायकल जॅक्शनची मुलगी पॅरिस जॅक्सन लेस्बियन असल्याचं समोर आलं आहे. ब्रिटीश ग्लॅमरस मॉडेल आणि अभिनेत्री कारा डेलेवेनसोबत तिचे समलैंगिक संबंध आहेत. ही गोष्ट जॅक्शनची 19 वर्षीय मुलीने मान्य केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅरिसचे भाऊ प्रिंस यांने आपल्या वडिलांना सांगितलं की, जर आपले वडील मायकल जॅक्शन जर आज असते तर त्यांना देखील आपल्या मुलीच्या निवडीवर नक्कीच गौरव असतो. 'रडार ऑनलाइन'ने दिलेल्या माहितीनुसार, प्रिंसने सांगितले की, माझ्या वडिलांना त्यांच्या मुलीने स्वतः निवडलेल्या रस्त्याचा नक्कीच आनंद झाला असतो. आतापर्यंत तिने स्वतःचे निर्णय स्वतःच निवडले आहेत. मायकलने त्यांना शिकवलं आहे की, प्रेमाची कोणतीच सीमा नसते. वडिलांनी तिला लहानपणापासूनच शिकवले होते की, प्रेमाला कोणती बंधनं नसतात. यात शरीर, लिंग यांसारख्या गोष्टींचाही समावेश नसतो.’



पॅरिस आणि कारा यांच्या रिलेशनशिपबद्दल आधीपासूनच चर्चा होत होती. मात्र आता पॅरिसने त्यावर होकार देऊन मोहर लगावली. तसेच पॅरिसने याबाबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  संपूर्ण जॅक्सन कुटुंबिय पॅरिसच्या या निर्णयाने खुश आहेत. गेल्या आठवड्यात पॅरिस आणि कारा एकमेकांना किस करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघी तेव्हा डबल डेटवर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत मैकॉले कल्किन आणि तिची गर्लफ्रेंड ब्रेंडा स्ट्रॉन्गही होती.


पॅरिस इन्स्टाग्रामवर फार सक्रीय आहे. तिने डेलेवेनसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्या दोघी एकत्र कॅरल सिनेमा पाहत आहेत. या सिनेमाचा विषय लेसबियन संबंधांवर आधारित होता. पॅरिस आणि काराची पहिली ओळख २०१७ मध्ये झाली. एमटीव्ही मूव्ही अॅण्ड टीव्ही पुरस्कार सोहळ्यामध्ये या दोघी पहिल्यांदा भेटल्या होत्या. या समलैंगिक मुद्यावरून पुन्हा एकदा चर्चा पॅरिस आणि कारा चर्चेत आली आहे.