Pathan : बेशरम रंग गाणे लागताच प्रेक्षकांच्या कृतीने भडकले बाऊन्सर्स; खावा लागला कपडे फाटूस्तर मार
Pathan Movie Row : शाहरुख खान दीपिकाच्या पठाण चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. शाहरुखचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहते खूप खूश आहेत. या चित्रपटाने तब्बल काही तासांमध्येच 100 कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे
Pathan Movie Row : प्रदर्शनापूर्वीपासूनच वादग्रस्त ठरलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (shah rukh khan) 'पठाण' चित्रपट (Pathan) सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालतोय. तब्बल दोन वर्षानंतर शाहरुख खानचे जोरदार कमबॅक केले आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली जात होती. दुसरीकडे चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केलाय. तर काही ठिकाणी अद्याप या चित्रपटाला विरोध कायम आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहे. दुसरीकडे पठाण चित्रपटाच्या शोदरम्यान, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पठाण चित्रपटावरून बुधवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीच्या एका मॉलमध्ये (Mall) जोरदार हाणामारी झाली. या हाणामारी दरम्यान अनेक जण गंभीर जखमी झाले. या मारामारीमुळे संपूर्ण मॉलमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी प्रकरण शांत केले. या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांनी धाव घेतल्याने प्रकरण निवळलं
बरेलीच्या फिनिक्स मॉलमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. यावेळी चित्रपटगृहात असलेल्या बाऊन्सर्सनी एका तरुणाला खूप मारहाण केल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. पठाण चित्रपटाबाबत सुरू असलेला विरोध पाहता पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे सिनेमागृहाबाहेर पोलिसही सज्ज आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि प्रकरण शांत केले. मात्र तोपर्यंत बरेच काही घडून गेले होते.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीतील फिनिक्स मॉलमध्ये पठाण चित्रपट सुरू होता. दीपिकाच्या भगव्या बिकिनीमध्ये 'बेशरम' गाणे येताच काही प्रेक्षकांनी विचित्र कमेंट करण्यास सुरुवात केली आणि मोबाईलवरून चित्रपटाचे व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ काढणे थांबवा असे म्हटले आणि हे सगळे नियमांच्या विरोधात असल्याचे सांगितले. यावरून सुरु झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यानंतर बाऊन्सर्सनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकरण आणखी चिघळलं. व्हायरल व्हिडीओमध्ये चित्रपटगृहामध्ये असलेल्या बाऊन्सरने एका तरुणाला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली.
100 कोटींचा गल्ला पार
दरम्यान, शाहरुखचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे चाहते खूप खूश आहेत. एकीकडे या चित्रपटाला समीक्षक आणि सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवरही धमाकेदार कमाई झाली आहे. KoiMoi च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे.