11 लग्झरी गाड्या, 4 वर्षांमध्ये 60 कोटींनी वाढली Pawan Kalyan यांची एकूण संपत्ती!
Pawan Kalyan Total Net Worth : पवन कल्याण यांची एकूण नेटवर्थ किती माहितीये...
Pawan Kalyan Total Net Worth : सुपरस्टार अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा आज 2 सप्टेंबर रोजी 56 वा वाढदिवस आहे. या निमित्तानं त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या आगामी चित्रपटाच्या घोषणीची खूप प्रतीक्षा होती. पण त्यांना यावेळी कोणत्याही आगामी चित्रपटाविषयी काही अपडेट मिळालेली नाही आहे. मात्र, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांची एकूण संपत्ती किती आहे ते जाणून घेऊया.
पवन कल्याण यांनी एप्रिल महिन्यात लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करत त्यांच्या एकूण मालमत्तेचा तपशील जाहीर केला आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे 46.17 कोटींची जंगम आणि 118.36 कोटी रुपयांची स्थल संपत्ती आहे. यानुसार, पवन कल्याण यांनी त्यांच्याकडे एकूण संपत्ती ही 164 कोटी रुपयांची असल्याचे सांगितले आहे.
गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची संपत्ती ही 60 कोटींची वाढ झाली आहे. पवन कल्याण यांच्यातकडे 11 लग्झरी गाड्या असून त्यांची एकूण किंमत ही 14 कोटी आहे. पवन कल्याण यांच्याकडे रेंज रोव्हर, हार्ले डेव्हिडसन सारख्या लग्झरी कार आणि बाइक आहेत. ते सध्या तेलगू चित्रपट ओजीमध्ये अभिनय करत आहेत. या चित्रपटात प्रियंका मोहनची मुख्य भूमिका आहे.
कोडिनेल कल्याण बाबू हे 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अक्कडा अब्बै इक्कडा अम्मायी’ नंतर पवन कल्याणच्या नावानं ओळखू लागले. 55 वर्षांच्या पवन कल्याण हे दिग्गज अभिनेता चिरंजीवी आणि नागेंद्र बाबू यांचे छोटे भाऊ आहेत. चित्रपटसृष्टीत आल्याच्या काहीच वर्षात पवन कल्याण यांनी तेलगू चित्रपटसृष्टीत स्वत: ची एक ओळख निर्माण केली. त्यांनी एकामागे एक अनेक हिट चित्रपट दिलेत. त्यानंतर त्यांचं नाव हे लोकप्रिय कलाकारांपैकी एकमध्ये घेतले जाऊ लागले.
हेही वाचा : अभिषेक-ऐश्वर्या विभक्त होण्याच्या चर्चांमध्ये दुबईतील 'तो' VIDEO VIRAL
पवन कल्याण यांनी आतापर्यंत 3 लग्न केले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव नंदिनी होतं. तर 19 वर्षांचे असताना नंदिनी यांनी पवन कल्याण यांच्याशी लग्न केलं. तर लग्नाच्या 4 वर्षानंतर घटस्फोट दिला. त्यानंतर रेणु देसाई यांच्यासोबत ते रिलेशनशिपमध्ये आले आणि त्यांच्याशी त्यांनी लग्न केलं. तर 2008 मध्ये ते दोघे विभक्त झाले. त्यांना एक मुलगा देखील आहे. त्यानंतर 2013 मध्ये पवन कल्याण यांनी रशियन अभिनेत्री अन्ना लेजनेवाशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा देखील आहे.