मुंबई : भारताला ऐतिहासिक गोष्टींचा आणि कलेचा वारसा लाभला आहे. लावणी ही कला देखील ऐतिहासिक आहे आणि आज देखील ही कला जोपासणारे कलाकार देखील तितक्याच या कलेचा वारसा पुढे नेत आहेत. आतापर्यंत फक्त महिला आपल्याला लावणी सादर करताना दिसल्या पण आता रूपारेल कॅलेजचा विद्यार्थी पवन तटकरे त्याची लावणी कलेची आवड जोपासत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


त्याचं यूट्यूब चॅनेल देखील आहे. लावणी ही माझी संस्कृती आहे, आणि मी ह्या संस्कृतीचं जतन करतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. असं देखील त्याने लिहिलं आहे. पवनला  बाबजी कांबळे सारखचं म्हणायला काही हरकत नाही.