दूसऱ्या लग्नासाठी यूट्युबर अरमान मलिकनं बदलला धर्म? पहिल्या पत्नीचा खुलासा
Payal Malik On Armaan Malik Converted To Islam : अरमान मलिकनं दुसऱ्या लग्नासाठी धर्म परिवर्तन केल्याच्या प्रकरणात पायलचा खुलासा...
Payal Malik On Armaan Malik Converted To Islam : दोन पत्नींसोबत बिग बॉस ओटीटीच्या घरात गेलेल्या अरमान मलिकला सगळेच ओळखतात. मात्र, एका आठवड्यानंतर त्याची पहिली पत्नी म्हणजेच पायल मलिकला बिग बॉसच्या घरातून एविक्ट व्हावं लागलं. घरातून बाहेर आल्यानंतर पायलनं तिच्या आणि अरमान मलिकसोबत क्रितिकाच्या रिलेशनशिपविषयी सांगितलं. तिनं यावेळी अरमानला इस्लाम कबूल करण्यावर आणि दुसरं लग्न करण्यावर वक्तव्य केलं आहे.
पायल मलिकनं बिग बॉसच्या घरात राहून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. तिला दु:ख आहे की बिग बॉस ओटीटी 3 मधून तिला लवकर बाहेर पडावं लागलं. तर पायलनं सांगितलं की जगाला दाखवू शकते की अरमान आणि क्रितीकाच्या लग्नाची तिला काही तक्रार नाही. पण तिसा अजूनही वाईट वाटतं. 'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत पायल अनेक लग्न करण्यावर म्हणाली, 'हा अरमाननं माझ्यासोबत चुकीचं केलं आहे. कारण त्याच्यासाठी मी घर सोडलं. मी 8 वर्षांपासून त्याच्यावरच अवलंबून होते, त्याच्यासोबत राहिले होते, तो माझ्यासाठी सगळं काही होता आणि मग अचानक त्याच्या आयुष्यात कोणी आलं. तर हो माझ्यावर अन्याय झाला आहे.'
पायल पुढे म्हणाली, 'आजही आणि भविष्यातही मी हेच बोलेन की मी त्याची पहिली प्रायॉरिटी राहिनं. क्रितिका माझ्यानंतर असेल आणि तिला हे माहित आहे. त्यासोबत या विषयी आमच्या युट्यूब फॅमिलीला देखील माहित आहे.'
संदीपचा अरमान कसा झाला?
पुढे पायल संदीपचं नाव अरमान कसं झालं आणि दुसऱ्या लग्नासाठी धर्म परिवर्तन करण्याविषयी बोलली आहे. हे खरं आहे की अरमान मलिक यांनी लग्न केलं. पण हे सत्य नाही की त्यानं इस्लाम स्वीकारला. तो एका जाट कुटुंबातून येतो. तो मुस्लिम नाही. पायलनं हे देखील सांगितलं की जेव्हा तिची आणि अरमानची भेट झाली तेव्हा त्याचं पहिल लग्न हे मोडलं होतं.
पुढे पायलला विचारण्यात आलं की असं काय कारण होतं ज्यामुळे त्यानं तिला धोका दिल्यानंतर देखील ती त्याच्यासोबत राहते? तर पायल म्हणाली, 'दुसऱ्या लग्नानंतर मी त्याच्यासोबत राहणं पसंत केलं, कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्याशिवाय, मी माझा मुलगा चीकूसाठी या लग्नात आहे. अशा प्रकारे राहून मी आनंदी आहे. असं नाही की कोणी मला राहण्यासाठी मजबूर केलं. कोणीही महिला तिच्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाला मान्यता देणार नाही, त्यात जेव्हा त्याच्याकडे 1 रुपया नसतो तेव्हा, जर तुम्ही त्या नात्यात आनंदी नाही, तर कोणीही तुम्हाला त्या गोष्टीशी बांधून ठेवणार नाही.'