मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने गोव्यात अंमली पदार्थविरोधी अभियान राबवून २ परदेशीयांसह ३ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतला ड्रग्ज पुरवत होता. एनसीबीच्या पथकाने ७ आणि ८ मार्चला गोव्यातील विविध ठिकाणी छापा टाकला, त्यानंतर तिन्ही आरोपींना पकडण्यात एनसीबीला यश आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, छापेमारीदरम्यान 41 बोल्ट, 22 ग्राम कोकीन, 28 ग्राम चरस, 1 किलो पेक्षा अधिक गांजा, 150 ग्राम सफेद पावडर सहीत 10 हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर हेमंत साहा या मोठ्या ड्रग माफियाला अटक करण्यात एनसीबी पथकाला यश आलं आहे.


हा ड्रग माफिया मोठ्या प्रमाणात लोकांना ड्रग्ज पुरवायचा. त्यासोबतच हेमंतनं सुशांतसिंग राजपूतला अनेक वेळा ड्रग्जचा पुरवठा देखील केला होता. एनसीबीची टीम आता परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आहे.तसचं अटक करण्यात आलेल्या लोकांची सखोल चौकशी देखील केली जातेय.


अभिनेता सुशांतसिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली. वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतचा मृतदेह सापडला. सुरुवातीच्या तपासणीत असं दिसून आलं आहे की, सुशांतनं नैराश्यात येऊन आत्महत्या केली. मात्र, यानंतर सुशांतच्या कुटुंबीयानं सीबीआय चौकशीची मागणी केली.


सीबीआयने एनसीबीच्या सहकार्याने अनेक खुलासे देखील  केले. सीबीआयने एनसीबीसोबत एकत्र येऊन घटनेशी संबंधित अनेक महत्वाची माहिती दिली. या प्रकरणात सुशांतसिंग राजपूतची गर्लफ्रेंन्ड रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाचीही चौकशी केली गेली.


रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीनं सुशांतसिंग राजपूतसाठी बर्‍याच वेळा ड्रग्स मागवेल होते. या आरोपाखाली रियाला अटक करण्यात आलं होतं.