अर्शी खानचं अफगाणिस्तान कनेक्शन; लोकांनी हिणवताच म्हणाली....
अभिनेत्री अर्शी खानचा नेहमीच सोशल मीडियावर बोलबाला असतो.
मुंबई : बिग बॉस फेम अर्शी खानचा नेहमीच सोशल मीडियावर बोलबाला असतो. अर्शी तिच्या स्पष्टवादी शैलीसाठी ओळखली जाते. अर्शीने दोन वेळा बिग बॉसच्या घरात धूम ठोकली आहे. अलीकडेच अर्शी प्रसिद्धीझोतात आली होती. जेव्हा अभिनेत्रीने खुलासा केला की, तिचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला आहे. आता अर्शीने या विधानावर संपूर्ण गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं आहे.
एका बातमीनुसार, अर्शीच्या मते, ती अफगाणिस्तानची आहे मात्र तिचं कुटुंब तिथून भारतात स्थायिक झालं होतं. जेव्हापासून अर्शीने स्वतःला अफगाणी म्हटलं होतं, तेव्हापासून तिला वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल केलं जात आहे. अशा परिस्थितीत अर्शीने तिला सोशल मीडियावर पाकिस्तानी म्हणणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
अर्शी खानने ट्रोलर्सला दिलं उत्तर
अर्शीने उत्तर दिलं आहे की, ''लोकांना वाटतं की, मी पाकिस्तानची नागरिक आहे. बऱ्याचवेळा मी पाहिलं आहे की, काही लोकं विनाकारण माझ्या नागरिकत्वासाठी मला ट्रोल करतात. अशा लोकांना असं वाटतं की, मी एक पाकिस्तानी आहे. जी भारतात येऊन स्थायिक झाली आहे. असं बोलणाऱ्या लोकांमुळे माझ्या कामावरही परिणाम होतो.
एवढंच नव्हे तर अर्शी पुढे म्हणाली की, हे सगळं सांगणं हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट अनुभव आहे. मला प्रत्येकाला हे स्पष्ट करावं लागतय की, मी एक पूर्णपणे भारतीय आहे. माझ्याकडे भारत सरकारशी संबंधित सर्व कागदपत्रेही आहेत. मी पाकिस्तानी नाही तर भारतीय आहे. अर्शीच्या मते, मी एक अफगाण पठाण आहे. तिने स्पष्ट केलं आहे की, ती युसूफ जहीर पठाण ग्रुपची आहे.
अर्शीने खुलासा केला आहे की, तिचे आजोबा अफगाणिस्तानातून भारतात स्थायिक होण्यासाठी आले होते. मात्र ते भोपाळमध्ये जेलर राहिले. माझी पूर्वज जरी अफगाणिस्तानातील पण मी पूर्णपणे भारतीय आहे.
तमिळ चित्रपटांमध्ये पदार्पण
अर्शी खान बिग बॉस 11 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. यानंतर ती बिग बॉस 14 मध्येही दिसली. दोन्ही सीझनमध्ये अर्शीने तिच्या खास स्टाईलने सर्वांना वेड लावलं. अर्शी बिगबॉसनंतरच प्रकाश झोकात आली. अर्शी खानने 2014 साली मल्ली मिश्थू या तामिळ चित्रपटातून पदार्पण केलं.