`सेक्स स्कँडल` प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्रीनं गुपचूप उरकला विवाह
गेल्या जून महिन्यात या दोघांनी साखरपुडाही केला होता...
मुंबई : बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन सुरू आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अनेक सेलिब्रिटीजच्या घरातही बॅन्ड-बाजा वाजताना दिसतोय. याच दरम्यान टीव्हीवर दिसणारे ओळखीचे चेहरेही आपापल्या आयुष्यात विवाहाद्वारे पुढचं पाऊल टाकताना दिसत आहेत. अदिती गुप्ता, पारुल चौधरीनंतर आता अभिनेत्री श्वेता प्रसाद बासू हिनंदेखील आपल्या बॉयफ्रेंडसोबत रोहीत मित्तलसोबत सप्तपदी पूर्ण केलीय. श्वेतानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर विवाहाचे फोटो शेअर केलेत.
श्वेतानं बॉयफ्रेंड रोहित मित्तल याच्यासोबत बंगाली परंपरेनुसार विवाह केलाय. श्वेता आणि रोहित गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. तसंच दोन वर्षांपासून ते लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते... गेल्या जून महिन्यात या दोघांनी साखरपुडाही केला होता... विवाहानंतर श्वेता आणि रोहित मुंबईत एक रिसेप्शनचंही आयोजन करणार आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता कलाकार
उल्लेखनीय म्हणजे श्वेतानं बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून 'मकडी' सिनेमाद्वारे प्रवेश केला होता. या सिनेमासाठी २००२ साली श्वेतानं राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला होता.
श्वेता मकडीशिवाय इकबाल, वाह! लाइफ हो तो ऐसी, डरना जरुरी है यांसारख्या सिनेमांतही दिसलीय. श्वेता टीव्ही आणि दाक्षिणात्य सिनेमांतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
एकता कपूरच्या 'कहानी घर घर की' या कार्यक्रमातही तीनं महत्त्वाची भूमिका निभावली होती.
'सेक्स स्कँडल' प्रकरणात नाव
श्वेता प्रसाद बासू हिनं काही वाईट काळही पाहिलाय. २०१४ मध्ये हैदराबादमधील बंजारा हिल्समध्ये एका सेक्स स्कँडलमध्ये श्वेताचं नाव आलं होतं. दोन महिने रेस्क्यू होममध्ये श्वेता होती त्यानंतर तिला सेशन कोर्टानं या प्रकरणात क्लीनचीट दिली होती. त्यानंतर श्वेतानं आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
श्वेताचं नाव सेक्स स्कॅन्डल प्रकरणात आल्यानंतर सिने इंडस्ट्रीतल्या अनेक जणांनी श्वेताला समोरून पाठिंबा दर्शवला होता. हन्सल मेहता आणि विशाल भारद्वाज यांसारख्या सिने-निर्मात्यांनीही तिला सिनेमांची ऑफर दिली होती. इतंकच नाही तर यानंतर श्वेतानं अनुराग कश्यप, विकास बहल आणि विक्रमादित्य मोटवानी यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये स्क्रिप्ट कन्सल्टंट म्हणूनही काम पाहिलं होतं... या प्रकरणामुळे, आपण मोडून पडलेलो नाही तर आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाल्याचं श्वेतानं म्हटलं होतं.