मुंबई : 'शोले' हा चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड. जय, वीरू, गब्बर, ठाकूर अशा पात्रांनी या चित्रपटाला ओळख दिली. सोबतच आणखी एका पात्रानंही 'शोले'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. हा चेहरा होता अभिनेता मॅक मोहन यांचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'शोले'तील 'अरे ओ सांबा, कितने आदमी थे?'  असं गब्बर ज्याला विचारतो तेच हे मॅक मोहन. मिन्नीशी विवाहबंधनात अडल्यानंतर दोन मुली आणि एक मुलगा असं त्यांचं कुटुंब बहरलं. मॅक मोहन यांच्या दोन्ही मुली सौंदर्याच्या बाबतीत कुणा एका अप्सरेहून कमी नाहीत. 


मंजरी आणि विनती मकिजानी असं या दोघींचं नाव आहे. मॅक मोहन यांची मोठी मुलगी मंजरी ही एक चित्रपट निर्माती आहे. लघुपटांसाठी ती विशेष ओळखली जाते. 2012 मधील 'द लास्ट मार्बल' आणि 2014 मधील 'द कॉर्नर टेबल' या तिच्या कलाकृतींना विशेष नावाजलं गेलं.


मंजरीनं डंकर्क', 'द डार्क नाईट राइसेस' 'वंडर वुमन' आणि 'मिशन इम्पॉसिबल' सारख्य़ा चित्रपटांसाठी सहाय्यक निर्माती म्हणून काम पाहिलं आहे. हिंदी चित्रपट जगतातही तिनं 'सात खून माफ' आणि 'वेक अप सिड'सारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे. 




मॅक मोहन यांची दुसरी मुलगी विनती मकिजानी ही निर्माती आणि एक अभिनेत्री आहे. 2010 मध्ये आलेल्या शाहरुखच्या 'माय नेम इज खान', 'स्केट बस्ती' आणि 'स्केटर गर्ल' यासाठी ती ओळखली जाते. 



मॅक मोहन यांच्या दोन्ही लेकी आपल्या वडिलांनीच आखून दिलेल्या मार्गावर चालत आहेत. Mac Productions या निर्मिती संस्थेअंतर्गत त्या विविध कलाकृती साकारतात. सततच्या झगमगाटापासून दूर असल्या तरीही या दोघी बहिणींनी आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे.


(सर्व छायाचित्र- इन्स्टाग्राम)