मुंबई : अभिनेता रणबीर कपूर अनेक मुलींच्या मनावर राज्य करतो. पण रणबीरच्या मनात मात्र अभिनेत्री आलिया भट्टसाठी एक खास जागा आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. एवढंच नाही सोशल मीडियावर देखील दोघे एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. 'तुम्ही लग्न कधी करणार?' असा प्रश्न दोघांना चाहत्यांकडून सतत विचारला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये रणबीरला फोटोग्राफर म्हणाला , 'आरके लग्नात भेटू...' यावर रणबीर म्हणाला, 'कोणाचं लग्न?' रणबीरची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर सगळे हसू लागले, त्यानंतर फोटोग्राफर म्हणाला, 'लव रंजर सरांचं लग्न...'



लव रंजनच्या लग्नाची चर्चा
‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. लव रंजन त्याच्या गर्लफ्रेंडसोबत 20 फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहे. त्यामुळे फोटोग्राफर लव रंजनच्या लग्नाला भेटू असं म्हणाला...


सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहात आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पार्टनरसोबत लग्न केलं. आता चाहत्यांना रणबीर आणि आलिया कधी लग्न करणार? या प्रतीक्षेत आहेत.