PHOTO : सुट्टयांचा आनंद घेणाऱ्या मंदिराचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत
एका स्विमिंग पूलमध्ये पाण्यात उभी असलेल्या मंदिरा बेदीसमोर खूप सारे खाद्यपदार्थही पाण्यावर तरंगताना दिसत आहेत
मुंबई : छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यंत आणि क्रिकेटच्या मैदानावरही आपली वेगळी ओळख तयार करणारी अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. आपला आनंद ती अनेकदा सोशल मीडियावर फोटोंच्या माध्यमातून शेअर करताना दिसतेय. मंदिरानं शेअर केलेल्या फोटोमध्ये मंदिरा गुलाबी रंगाच्या बिकीनीमध्ये दिसतेय. हे फोटो पाहून ४६ वर्षीय अभिनेत्रीला अनेक जणांकडून तिच्या फिटनेसचं रहस्य काय? असा प्रश्न विचारला जातोय.
गेल्या वर्षीही मंदिरा आपला मुलगा आणि पतीसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली होती. मालदीव हे तिचं फेव्हरेट हॉलिडे डेस्टिनेशन झालेलं दिसतंय.
एका स्विमिंग पूलमध्ये पाण्यात उभी असलेल्या मंदिरा बेदीसमोर खूप सारे खाद्यपदार्थही पाण्यावर तरंगताना दिसत आहेत.
मंदिराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकलीत तर तुम्हाला अनेक वर्कआऊट व्हिडिओही दिसतील. वयाच्या या टप्प्यावर मंदिरा इंडस्ट्रीतील 'एब्स गर्ल' म्हणून समोर येतेय.
१५ एप्रिल १९७२ रोजी मुंबईतील एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या मंदिरानं टीव्ही सीरियल 'शांति'पासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर मंदिरा शाहरुख-काजल फेम 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या हिट सिनेमातही दिसली. त्यानंतर तिनं औरत, दुश्मन, क्योंकि सास भी कभी बहू थी यांसारख्या अनेक सीरियलमध्ये काम केलं.
टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर मंदिरा एका क्रिकेट होस्टच्या रुपात प्रेक्षकांसमोर आली. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप आणि चॅम्पियन ट्रॉफी होस्ट केल्यानंतर २००६ मध्ये मंदिरानं आयपीएलचा दुसरा सीझनही होस्ट केला. क्रिकेटला ग्लॅमरचा तडका देण्याचं श्रेय मंदिरालाच द्यायला हवं.
मंदिरा १९९९ साली प्रोड्युसर राज कौशल याच्यासोबत विवाह बंधनात अडकली. मंदिरा अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक 'व्यावसायिका'ही आहे. मंदिरानं लॅक्मे फॅशन वीक २०१४ मधून डिझायनर म्हणून पाऊल पुढे टाकलं. २०१३ मध्ये तिनं आपलं 'सिग्नेचर साडी स्टोअर' लॉन्च केलं होतं. मंदिरा आणि राज या जोडप्याला एक मुलगा आहे त्याचं नाव 'वीर' आहे.