मुंबई : नवी दिल्लीत शुक्रवारी फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोंसला यांचा 'वेडींग ऑफ द ईयर' हा फॅशन शो जेडब्ल्यू मॅरियटमध्ये आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोमध्ये अभिनेत्री सोनम कपूर, दिशा पटानी आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली ही तिची आई अमृता सिंह बरोबर दिसली. या फॅशन शोमध्ये सोनम कपूर ही एका विवाह झालेल्या रूपात रॅम्पवरून चालताना दिसली. सोनम वधूच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तर दुसरीकडे पूर्ण शोमध्ये अभिनेत्री सारा अली खानकडेच सगळ्यांचं लक्ष वेधून होतं .सारा अलीने जो ड्रेस घातला होता. तो फारच तीला सुंदर दिसत होता. त्यामुळे ती आकर्षणाचं केंद्र बनली होती.