पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठीचा झेंडा फडकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण या महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभागात फास्टर फेणे, कच्चा लिंबू,मुरांबा, पिंपळ,  झिप-या, नशीबवान,  म्होरक्या या सिनेमांची वर्णी लागलीये. 11 ते 18 जानेवारी दरम्यान पुण्यात हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाच्या उदघाटनाला अभिनेते ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांची खास उपस्थिती असणार आहे.


यावेळी राज कपूर यांच्या 23 चित्रपटांची रीळं राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडं सोपवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलीय. त्याचप्रमाणे पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलद्वारे विनोद खन्ना, रिमा लागू, कुंदन शाह, श्याम आणि शशी करून यांच्यावर आधारित सिनेमे देखील दाखवणार आहेत. यंदा या फेस्टिवलमध्ये स्क्रिनिंग हे रात्री 9 ते 11 पर्यंत होणार आहे.