मुंबई : 'पीएम मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशोगाथेवर आधारलेल्या चित्रपटाचे वाद अद्याप शमलेले नाही. चित्रपटाला सतत तारीख पे तारीख मिळताना दिसत आहे. सोमवारी न्यायालयाने चित्रपटाबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. चित्रपटाला अद्यापही स्थगित देण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी करण्यात येणार आहे. याशिवाय याचिकाकर्त्यांकडून चित्रपटाच्या एका कॅपीची मागणी करण्यात आली होती. त्यांची ही मागणी न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी होण्याऱ्या सुनावणी दरम्यान विरोधकांकडून सबळ पुराव्यांची मागणी करण्यात आली आहे. सोमवारी याचिकाकर्त्यांना एक दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या याचिकेवर म्हंटले की, 'आम्हाला कोणालाही निर्देश देण्याची काहीही गरज नाही, की चित्रपटाची कॉपी तुम्हाला प्रदान केली जाईल.        


'पीएम मोदी' चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. परंतू विरोधी पक्षांच्या आक्षेपामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबत चालली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ११ एप्रिलला 'पीएम मोदी' प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली होती. सेन्सॉर बोर्डाकडून मान्यता मिळेल या दृष्टीने घोषणा केल्याचे वक्तव्य त्यांच्या वकीलाकडून करण्यात आले आहे. तर आज होणाऱ्या सुनावणीत चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळेल का हे पाहाणे औत्सुक्याचं ठरणार आहे.