PM's Grand Daughter in Bollywood : 90 च्या दशकातील एक अभिनेत्री जिनं मोठ्या पडद्यावर सगळ्यांची मने जिंकली. या अभिनेत्रीचं आणि माजी पंतप्रधान यांचं एक नातं होतं. या अभिनेत्रीनं अनेक हिट चित्रपट दिले, त्यातूनल तिला खूप यशही मिळालं. मात्र, मग असं काही झालं की ज्यानं अभिनेत्रीचं करिअर संपलं. ही अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चला तिच्याविषयी जाणून घेऊया. ही अभिनेत्री शेजारच्या देशातून भारतात आली होती. तिच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. पण स्वत: चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती भारतात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अभिनेत्रीचं नाव मनीषा कोयराला आहे. मनीषा कोयराला ही नेपाळचे माजी पंतप्रधान बिशेश्वर प्रसाद कोयराला यांची नात आहे. तिनं सगळं काही असताना नेपाळ सोडलं आणि मुंबईत अभिनय क्षेत्रात स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली. मोठ्या कलाकारांसोबत काम करण्यासाठी मनीषानं खूप प्रयत्न केले पण तिला ती संधी मिळत नव्हती. नशिबानं तिला एक चित्रपट मिळाला आणि त्या चित्रपटातून तिला एका रात्रीत यश मिळालं. त्यानंतर एक काळ असा आला की मोठ्या कलाकारांसोबत काम केल्यानंतर तिनं एक चित्रपट केला आणि त्या चित्रपटानंतर मनीषाला फ्लॉप अभिनेत्री म्हणू लागले. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आता पुढे काय करणार त्याविषयी बोलताना सांगितलं की आता ती स्वत:ला वेळ देत आहे. मनीषाच्या सोशल मीडिया अकाऊंटविषयी बोलायचे झाले तर ती इन्स्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये म्हटलं होतं की 'अनेक लोक मला विचारतात की आता काय करते? मात्र, कधी कधी वाटतं की तुम्ही 53 वर्षांच्या व्यक्तीला विचारत आहात की तुम्ही जास्त काही करू शकत नाही. या गोष्टीचा मला आनंद आहे की मी आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी शिकत आहे. फक्त तेच करते जे मला आवडतं. कधी-कधी काहीच करायचं नाही, माझ्या मांजरी आणि श्वानांसोबत वेळ व्यथित करण्याशिवाय पुस्तकं वाचणं, गाणी ऐकणं आणि आध्यात्मिकतेला वेळ देणं. जिमिंगसोबतच वर्ल्ड टूरचा देखील आनंद घेते. 30 वर्षांच्या करिअरमध्ये 100 चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता तिला वाटतं की तिनं आता स्वत:साठी काही काळ ठेवला आहे.'


हेही वाचा : स्वत: पत्नीसोबत अफेअर ठेवणारा अभिनेता, अन्नु कपूर यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं?


मनीषानं सांगितलं की 'मला वाटतं की तुम्ही एकटे असता तेव्हा देव तुमतच्यासाठी मार्ग काढत असतो आणि माझ्याजवळ तर खूप मित्र आहेत. ते माझ्यासाठी असलेला खजिना आहे.'