मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे तुफान चर्चेत आहे. पण आता सध्या अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. रणवीर येत्या 'फिल्मफेअर' सोहळ्यात होस्टची भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये रणवीरसोबत अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) देखील दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे  यावेळी 'फिल्मफेअर'च्या मंचावर चाहत्यांना रणवीर आणि अर्जुनचा दोस्ताना पाहायला मिळणार असं म्हणायला हरकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन आणि रणवीरने 'गुंडे' (ranveer singh and arjun kapoor movie) सिनेमात एकत्र स्रिन शेअर केली. या सिनेमात दोघांसोबत अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) मुख्य भूमिकेत होती. सिनेमानंतर चाहत्यांना दोघांची जोही पुन्हा पाहायला मिळणार आहे. पाहा व्हिडीओ... 


दरम्यान, रणवीर सिंगनं सोमवारी चेंबूर पोलिसांसमोर (Mumbai Police) आपला जबाब नोंदवला. या प्रकरणी पोलिसांनी रणवीरला (ranveer singh Nude Photoshoot) दोनदा समन्स पाठवलं होतं. सोमवारी सकाळी रणवीर त्याच्या कायदेशीर टीमसह चेंबूर पोलीस स्टेशनला पोहोचला आणि पोलिसांनी त्याचा दोन तास जबाब नोंदवला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यादरम्यान पोलिसांनी रणवीरला अनेक प्रश्न विचारले. पुढील तपासात सहकार्य करू, असं रणवीर सिंग आणि त्याच्या टीमनं पोलिसांना आश्वासन दिलं. तर पुन्हा गरज वाटल्यास पुन्हा चौकशीला बोलावले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. 



एनजीओच्या एका अधिकाऱ्याने तक्रारीत आरोप केला होता की, "अभिनेत्याने आपल्या न्यूड फोटोशूमुळे महिलांच्या भावना आणि त्यांच्या प्रतिष्ठेला दुखावले आहे." एवढंच नाही तर, अनेकांनी रणवीरच्या न्यूड फोटोशूटला विरोध देखील केला. 


न्यूड फोटोशूटनंतर काय म्हणाला रणवीर? (ranveer singh after nude photoshoot
''मी लोकांची पर्वा करत नाही. मी काय घालावं आणि काय घालू नये हे मी ठरवणार. लोकांचं काम फक्त बोलणं आहे. मला त्याची पर्वा नाही. एवढच नव्हेतर मी 1000 लोकांच्या समोर असं फोटोशूट करु शकतो''. असं रणबीर एका  मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. 


त्यामुळे रणवीर सिंगच्य न्यूड फोटोशट (nude photoshoot) प्रकरणी पुढे काय होणार हे येणारा काळच ठरवेल. वादग्रस्त फोटोशूटनंतर आता रणवीर सिंगवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. ज्याच्या आधारे रणवीर सिंग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. या फोटोशूटसाठी लोक त्याला खूप ट्रोल करत आहेत.