Ponniyin Selvan 2 box office collection Day 5: 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटानं अवघ्या काहीच दिवसांत इतिहास रचला आहे. 2015 साली आलेल्या 'बाहूबली' (Ponniyin Selvan Box Office Collection Today) या चित्रपटानं न भूतो न भविष्यति असा विक्रम केला होता. 'बाहूबली'ची हजारो कोटींची घोडदौड पाहून यापुढे असा विक्रम कोणी करून शकलेल का यावर प्रश्न उपस्थित झाले होते त्यातून काहींनी या चित्रपटानंतर असा कोणता चित्रपट येणार नाही अथवा येऊ शकणार नाही असेही भाकित केले असेल तर त्यांचे भाकित यावेळी फोल ठरणार आहे कारण 'बाहूबली'च्याही तोडीस तोड विक्रम 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटानं केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटानं जगभरात 200 कोटींची गल्ला पार केला आहे. त्यातून आता हा चित्रपट लवकरच 500 कोटी कमावले अशी शक्यता ट्रेड विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. (Ponniyin Selvan 2 crosses 200 crore rupees at box office know the latest collection day 5)


अवघ्या दोन दिवसातच या चित्रपटानं 100 कोटींचा गल्ला भरला होता. त्यानंतर पुन्हा दोनच दिवसात हा चित्रपट 200 कोटींच्या घरात पोहचला आहे. भारतातही (PS - 2 Box Office Collection in India) या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. Sacnilk या वेबसाईटनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटानं 24 कोटी रूपये, दुसऱ्या दिवशी 26.2 कोटी रूपये, तिसऱ्या दिवशी 30.3 कोटी रूपये, चौथ्या दिवशी 23.25 कोटी रूपये तर पाचव्या दिवशी 11 कोटी रूपयांचा गल्ला भरला आहे. 


हेही वाचा - 'Pathaan' नंतर 'Ponniyin Selvan 2' नं केला विक्रम! 100 कोटींचा गल्ला पार करत बॉक्स ऑफिस गाजवलं..


प्रेक्षकांची पुन्हा एकदा पिरियड ड्रामाला पसंती


मध्यंतरी मराठीच काय पण हिंदीतही पिरियड ड्रामाचे (Period Drama) पेव फूटले होते. त्याचसोबत ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत होती. बायोपिक चित्रपटांनाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसत होती. त्यामुळे येत्या काही काळातही हाच ट्रेण्ड कायम राहिल अशी शक्यता असताना आता पुन्हा एकदा प्रेक्षकांनी अशाच एका सिनेमाला पसंती दर्शवली आहे. एकीकडे 22 एप्रिलला 'किसी का भाई किसी की जान' हा सलमान खानचा बिग बजेट सिनेमा प्रदर्शित झाला असताना ऐश्वर्याच्या 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. 



अमेरिकेत पोन्नियिन सेल्वनला प्रेक्षकांची गर्दी


समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, PS-2 चित्रपटानं अमेरिकेत चांगला बिझनेस केला आहे. पाच दिवसात 3.5 मिलियन डॉलर म्हणजे 28 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट क्रमांक 8 वर अमेरिकेच्या बॉक्स ऑफिसवर चालतो आहे.