कोरोनामुळे अभिनेत्रीचं लग्न टळलं, आता पतीसोबत बोहल्यावर चढणार त्यांचा मुलगा
आई-वडिलांच्या लग्नात उपस्थित राहणार मुलगा
मुंबई : टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी सध्या तुफान चर्चेत आली आहे. रंगणाऱ्या चर्चांना कारण देखील तितकचं खास आहे. पूजा आता लग्न करणार आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं? पण पूजाच्या लग्नात तिचा एक वर्षांचा मुलगा देखील उपस्थित राहणार आहे. त्याच एका करणामुळे पूजा तुफान चर्चेत आली आहे. मुलगा एक वर्षांचा झाल्यानंतर पूजा लग्न करणार असल्याची माहिती तिच्या होणाऱ्या पतीने दिली आहे. पूजाच्या पतीचं नाव कुणाल वर्मा असं आहे.
पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा लवकरचं लग्न करणार आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचं लग्न होवू शकलं नाही, पण आता ते लग्न सर्व विधी पूर्ण करत लग्न करणार आहेत. नुकताचं झालेल्या एका मुलाखतीत कुणालने लग्नाविषयी स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला, 'आमचं एप्रिल 2020 साली होणार होतं, पण कोरोनामुळे होवू शकलं नाही... पण आम्ही कोर्ट मॅरिज केलं....'
पुढे कुणाल म्हणाला, 'लग्ना दरम्यान पूजा गरोदर होती... त्यामुळे आमचं पारंपरिक पद्धतीत लग्न होवू शकलं नाही. मुलाच्या जन्मानंतर आमचं संपूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं. पूर्ण विधी आणि परंपरेनूसार लग्न व्हाव अशी पूजाची इच्छा आहे. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी लग्न करत आहे. महत्त्वाचं म्हणजे आमचा मुलगा देखील त्याच्या आई-वडिलांच्या लग्नात उपस्थित राहणार आहे...'
विशेष म्हणजे माझ्यासोबत मुलगाही बोहल्यावर बसणार आहे, जो नंतर त्याच्या मित्रांना सांगेल की मी माझ्या वडिलांच्या लग्नाला गेलो होतो. हे खूप विचित्र आहे परंतु कोरोना महामारीने सर्व काही बदलले आहे... असं देखील कुणाल म्हणाला... पूजा आणि कुणालच्या मुलाचं नाव कृषिव आहे.