मुंबई : 90 च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यापैकी एक म्हणजे पूजा भट्ट (Pooja Bhatt) होती. पूजाचं नाव त्याकाळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 'डॅडी' चित्रपटातून पूजानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1989 मध्ये आलेला हा चित्रपट पूजाचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी बनवला होता. मात्र, पूजाला खरी लोकप्रियता ही 'ऐ दिल है की मानता नहीं' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र पुजा भट्टने तिच्या एका जुन्या मुलाखतीत एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये ती म्हणाली होती की, एकदा तिच्या आईने महेश भट्ट यांना बाल्कनीमध्ये बंद केलं होतं. हे बोलताना यावेळी तिच्यासोबत आलियादेखील होती. माझं जीवन हे त्यांच्यासाठी एक श्रद्धांजलीच आहे.  मला आठवतं एकदा माझे वडिल दारूच्या नशेत घरी आला होते


आम्ही एकत्र कुटुंबात राहत होतो. आम्ही सर्व एका खोलीत राहायचो आणि ती खोली आमचं जग होतं." पूजा पुढे म्हणाली, "जेव्हा माझे आई-वडील भांडत असत, तेव्हा माझी आई मोठ-मोठ्याने ओरडायची नाही तर ती तिझा राग बाबंचं मॅगझिनही फाडून काढायची.


जेव्हा महेश भट्ट यांना त्यांच्या पत्नीने घरात कोंडून ठेवलं होतं
''एके रात्री आईने त्यांना बाथरूममध्ये बंद केलं होतं कारण ते नशेत घरी आले होते. मी बेडवर बसून रडत होतो आणि म्हणत होते की आई प्लिज थांब. पण त्यावेळी आई म्हणत होती की, मी तिच्या बाजूने असावं वडिलांच्या बाजूने नाही. 


पूजा पुढे म्हणाली की, जेव्हा दोघांची बाजू घेण्याची वेळ येते तेव्हा ती तिच्या वडिलांच्या बाजूने असते. अभिनेत्री पुढे म्हणाली की, तिचा भाऊ गंमतीने तिला 'महेश भट्टचा चमचा' म्हणायचा. मधल्या काळात महेश भट्ट यांनी त्यांच्या मुलीला लिपकिस करुन खळबळ उडवून दिली होती. या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. अभिनेत्रीने केलेलं हे वक्तव्य आताचं नसून बरंच जुनं आहे.  


पूजा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. खरं तर पूजाला दारू पिण्याचे गंभीर व्यसन होते. पूजाचे लग्न मनीष मुखिजा नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. मात्र, हे लग्न केवळ 11 वर्षे टिकलं, त्यानंतर तिचा आणि मनीषचा घटस्फोट झाला.