Pooja Hegde Is Dating Salman Khan: बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. पूजा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. करिअरविषयी बोलायचे झाले तर पूजा चांगल्या ट्रॅकवर काम करत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) पूजाची जवळीकता वाढत असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार याविषयी कोणताही पुरावा नाही. दरम्यान, अशा चर्चा सुरु झाल्या असून त्यावर चाहत्यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. उमेर संधू नावाच्या स्वयं घोषी चित्रपट समीश्रकानं या अफवेला दुजोरा दिला आहे.  सलमान खान आणि पूजा हेगडे हे नवीन हॉट कपल असल्याचं उमेर संधूनं ट्विट करत म्हटले आहे. त्यानं ट्विट करत म्हटले की, 'ब्रेकिंग न्यूज: नवीन कपल!!! मेगा स्टार #SalmanKhan #PoojaHegde च्या प्रेमात आहे!! त्याच्या प्रोडक्शन हाऊसनं तिला पुढील 2 चित्रपटांसाठी साइन केले आहे!! ते दोघे आजकाल एकमेकांसोबत बराच वेळ व्यथित करताना दिसतात!! सलमानच्या जवळच्या सूत्रांनी या बातमीला दुजोरा दिल्याचे यावेळी म्हटले आहे. 


पाहा क्रिटिकनं केलेलं ट्वीट



या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरु केली आहे. दरम्यान, ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी ही आगीसारखी पसरली आहे. खरंतर या अफवेत किती तथ्य आहे, याबाबत काहीही बोलणं कठीण आहे. सध्या पूजा ही सलमानच्या प्रोडक्शन हाऊसच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे. सेटवर त्यांच्यात जवळीक वाढल्याचे म्हटले जात आहे. 


हेही वाचा : Weekend Mood : घरबसल्या OTT वर घ्या 'या' चित्रपट आणि Web Series चा आनंद


पूजा लवकरच रणवीर सिंहसोबत सर्कस या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं आहे. दरम्यान, 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे आणि शहनाज गिल देखील दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंग सुरु झाली आहे आणि या दरम्यानच सलमान आणि पूजाच्या रिलेशनशिपच्या अफवाह सुरु झाल्या.