नवी दिल्ली : मॉडेल पूनम पांडे तिच्या बोल्ड आणि बिंदास अंदाजासाठी ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये 'नशा' चित्रपटातून डेब्यू करणारी पूनम पांडे सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन नेहमी अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर पूनमचे लाखो चाहते आहेत. परंतु पूनम पांडेचे हेच चाहते आता तिच्या अॅपवर तिला फ्रॉड म्हणत आहेत. पूनम पांडेने 2017 साली एक अॅप लॉन्च केलं होतं. या अॅपवर तिचे फोटो आणि व्हिडिओज पाहता येतात. या अॅपवर क्वाइन्स खरेदी केल्यानंतर पूनमचा संपूर्ण कंन्टेट पाहता येतो. परंतु या अॅपवर सध्या नकारात्मक रिव्ह्यू पाहण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूनमच्या अॅपवर एका यूजरने हे अॅप फ्रॉड असल्याचं म्हटलं आहे. हे लोक क्वाइन्सच्या नावावर पैसे घेतात परंतु क्वाइन्स देत नाहीत. एका यूजरने मी 6000 रुपये या अॅपवर खर्च केले आहेत. परंतु मला क्वाइन्स देण्यात आलेले नाही. मला माझे पैसे परत हवे असल्याचे सांगतले आहे. एका यूजरने या अॅपमध्ये माझे पैसे अडकले असून मी संबंधित व्यक्तींशी कॉन्टॅक्ट केल्यास कोणतंही उत्तर येत नसल्याचं त्याने म्हटलं आहे. 



गेल्या काही दिवसांपूर्वी पूनम पांडे तिच्या फिल्मफेयर लुकमुळे चर्चेत होती. फिल्मफेयर अॅवॉर्डमध्ये पूनमने घातलेल्या ब्लॅक ड्रेसमुळे तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी पूनम नेहमीच असं काही करत असल्याचं अनेक यूजर्सनी म्हटलं आहे.



गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला पूनम पांडेचा चित्रपट 'द जर्नी ऑफ कर्मा' बॉक्स ऑफिसवर काही कमाल करु शकला नव्हता. पूनमसह शक्ति कपूर यांनी या चित्रपटात भूमिका साकारली होती.