मुंबई : लॉकडाऊनच्या नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम पांडे आणि तिच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मरीन ड्राइव पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतंही कारण नसताना पूनम पांडे आपली कार घेऊन मरीन ड्राइव्ह परिसरात लॉकडाऊनच्या काळात फिरत होती. 



मिळालेल्या माहितीनुसार, आयपीसी कलम 188, 269 आणि 51 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी तिची बीएमडब्ल्यू कारही ताब्यात घेतली आहे. वरिष्ठ निरीक्षक पोलीस मृत्यूंजय हिरेमठ यांनी पीटीआयला माहिती दिली. पूनम पांडे आणि तिचा साथादीर सैम अहमद कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय मरीन ड्राईव्ह येथे फिरत होते. 


पूनम पांडेने पहिल्यांदा कायद्याच्या नियमांच उल्लंघन केलं असं नाही. या अगोदरही अनेकदा तिने नियम मोडले आहेत. यानंतर पूनम पांडेला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं आहे.