मुंबई : बॉलिवू़ड सुपरस्टार रणवीर सिंहने नुकतेच न्यूड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे फोटो त्याने  सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यानंतर त्याच्या या फोटोवर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.  त्यात आता या फोटोवर पुनम पांडेने प्रतिक्रिया दिली आहे. तिची ही प्रतिक्रिया पाहून सर्वांनाच धक्का बसलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॉडेल पूनम पांडे ही इंडस्ट्रीतील सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटी आहे. ती अनेकदा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते. त्यामुळे बोल्ड फोटोशुटसने नेहमीच चाहत्यांना धक्का देणाऱ्य़ा पूनम पांडेने आता रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर ट्विट केले आहे. रणवीर सिंगने तिला स्वतःच्या खेळात पराभूत केल्याचे पूनमनेही कबूल केले आहे.


रणवीर सिंगचे हे फोटोशूट शेअर करत पूनम पांडेनेही प्रतिक्रिया दिली आहे. 'रणवीर सिंग तू मला माझ्याच खेळात हरवले आहेस, असे तिने म्हटलेय.  



फोटोशुटमध्ये काय? 
रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट खूप चर्चेत आहे. नग्न होऊन रणवीर सिंगने पेपर मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. काही फोटोंमध्ये अभिनेत्याने काळ्या रंगाचा अंडरगारमेंट घातला आहे तर काही फोटोंमध्ये तो पूर्णपणे नग्न दिसत आहे. 


रणवीर सिंहची प्रतिक्रिया 


''मी लोकांची पर्वा करत नाही. मी काय घालावं आणि काय घालू नये हे मी ठरवणार. लोकांचं काम फक्त बोलणं आहे. मला त्याची पर्वा नाही. एवढच नव्हेतर मी 1000 लोकांच्या समोर असं फोटोशूट करु शकतो'', असे या फोटोशुटवर रणवीर म्हणाला आहे.