मुंबई : संजय लिला भन्साळीचा "पद्मावत" हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणी सेनेकडून होणारा सततचा विरोध, त्या संदर्भातील विवादास्पद वक्तव्य, विरोध होणाऱ्या सिनेमातील कलाकारांची मतं अशी एक ना अनेक कारणांमुळे हा सिनेमा हॉट टॉपिक आहे. असं सगळं असताना हॉट अभिनेत्री पूनम पांडेने ट्विट करून आपलं मत मांडल आहे. मात्र चाहत्यांनी उलटी तिची फिरकी घेतली आहे. अक्षरश: युझर्सनी पूनम पांडेची चांगली खिल्ली उडवली आहे. 


पूनमने ट्विटमध्ये लिहिले की, ‘आज पद्मावत बघायला जात आहे. हा टास्क रिअ‍ॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’सारखा असायला हवा.’ पूनमने हे ट्विट करताच युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका युजरने पूनमची खिल्ली उडविताना लिहिले की, ‘ताई कपडे घालून जा’! एका अन्य युजरने लिहिले की, ‘दीदी, पूर्ण कपडे परिधान करून जा अन्यथा लोक ‘पद्मावत’ऐवजी भलतेच काही तरी बघायला सुरुवात करतील.’




त्यामुळे पद्मावत हा सिनेमा या ना त्या कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आहे.